Monday, October 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedडॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र पिंपरी पुणे...

डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र पिंपरी पुणे यांच्यावतीने वैद्यकिय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय) ची भूमिका या विषयावर परिसंवाद

 

 

पुणे मे २०२४: डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र पिंपरी पुणे येथे नुकतेच संस्थेच्या आंतरराष्ट्रीय विभागातर्फे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि बायोएथिकल डीलेमाज’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुध्दिमत्ता अर्थात एआयमुळे झालेल्या प्रगतीचे मूल्यमापन या विषयावर आयोजित या परिसंवादासाठी आरोग्य सेवा क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ, संशोधक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आरोग्यसेवा क्षेत्रामधील एआय तंत्रज्ञानाच्या एकंदरीत अभ्यासातून वैद्यकीय हित साद्य करण्याच्या दृष्टीने या तंत्रज्ञानाची सद्यस्थितीतील गरज ओळखून आरोग्य क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. एआयमुळे जागतिक स्तरावर आरोग्यसेवा क्षेत्रात कसे बदल घडत आहेत यावर या क्षेत्रातील व्यावसायिकांना, तज्ज्ञांना सखोल संवादाची उत्तम संधी या कार्यक्रमामुळे मिळाली. तसेच तसेच याच्या वापरामुळे होणारे सकारात्मक व नाकारत्मक परिणामावर विचार मंथन झाले.

 

या कार्यक्रमात गटात्मक चर्चा, व्याख्याते तज्ञ् यांचे सर्वसमावेशक विचारमंथन तसेच ए आय विषयातील विविध मुद्द्यांवर प्रभावी सादरीकरणे अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण परिसंवादातून ज्ञानाचे आदानप्रदान झाले तसेच क्लिनिकल निर्णय घेण्यामध्ये एआयच्या एकंदरीत मूल्यमापनाचा अभ्यास, शस्त्रक्रियांमध्ये रोबोटिक्स आणि ऑटोमेशनचा वापर, भविष्यातील आरोग्य सेवा पद्धतींमध्ये एआयचा वापर यासारख्या विविध विषयांचा यात समावेश होता.

 

या कार्यक्रमातील प्रमुख वक्ते म्हणून सल्लागार, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र आणि युनायटेड किंगडममधील 5GoreConn इनोव्हेशनचे संचालक डॉ. राहुल ए. गोरे आणि डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी, पुणे येथील सहयोगी प्राध्यापिका श्वेता कोपर्डे उपस्थित होत्या. वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरही यावेळी आवर्जून हजर होते.

 

एआय डॉक्टरांची जागा घेऊ शकत नाही. मात्र, जे डॉक्टर एआयचा स्वीकार करत नाहीत, त्यांची जागा एआयचा वापर करणारे डॉक्टर नक्की घेऊ शकतील, असे डॉ. राहुल गोरे यांनी सांगितले. आरोग्यसेवा प्रणालींमध्ये एआयची महत्त्वाची भूमिकाही त्यांनी अधोरेखित केली. महत्वाकांक्षी वैद्यकीय व्यावसायिकांना एआय द्वारे गुंतागुंत, बारकावे, परीक्षण, निकष, विशिष्ठ अभ्यास आदी जाणून घेण्याबरोबरीने आरोग्यहित साद्य करण्यासाठी ए आय महत्त्वाची भूमिका बजावेल तसेच रुग्णाच्या सर्वांगीण गतिशील आणि योग्य निदानात्मक उपचार पद्धतीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे एका सवंगड्या प्रमाणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे ( अभिमत विद्यापीठ) विश्वस्त आणि खजिनदार डॉ. यशराज पाटील, म्हणाले, “आमच्या संस्थेत, आम्ही वैद्यकीय व्यावसायिकांच्या पुढच्या पिढीला आरोग्यसेवेच्या विकसित व्यवस्थेत नैतिक तत्त्वांचे पालन करत पुढे जाण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करून सक्षम करण्यासाठी समर्पित आहोत. हा परिसंवाद आरोग्यसेवा क्षेत्राच्या प्रगतीमध्ये आघाडीवर राहण्यासाठी, आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे उदाहरण आहे. आमची संस्था वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनातील उत्कृष्टतेचे उदाहरण म्हणून कायम आघाडीवर आहे आम्ही आधुनिकतेच्या वाटधरत नेहमी प्रयत्नशील असतो, त्याचेच हे उदाहरण आहे.

 

“आमची संस्था भविष्यातील आरोग्यसेवा क्षेत्रातील नव कल्पतेला वाव देण्याऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांना एकत्र आणण्यासाठी वचनबद्ध आहे, विशेषत: आता एआयमुळे आरोग्यसेवा क्षेत्रात मोठे बदल होत असताना, या भविष्यातील बदलांचे वेध घेणे महत्त्वाचे आहे. वैद्यकीय व्यावसायिक या नात्याने, आम्हाला या बदलांसह येणाऱ्या नैतिक आव्हानांना सामोरे जाण्याची गरज आहे,” असे डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जे.एस. भवाळकर म्हणाले. ते पुढे म्हणाले, “नैतिक मूल्ये राखून रुग्णसेवा क्षेत्रात सुधारणा करण्याची मोठी क्षमता एआयमध्ये आहे. ”

 

डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्राच्या बालरोग विभागाच्या प्रमुख, डॉ. शैलजा माने यांनी आरोग्य सेवा क्षेत्रातील नैतिक मूल्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. जगभरात वैद्यकीय शिक्षण, जैव नैतिक संशोधन आणि सुधारणांमध्ये गुंतलेल्या, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ प्रदान करून स्टुडंट्स विंग विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कशी मदत करू शकते, हे देखील त्यांनी स्पष्ट केले.

 

या परिसंवादात आरोग्य सेवा क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ, विद्यार्थी आणि पुण्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांचा सहभाग होता. यासह डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार आणि प्रशासन संचालक (गुणवत्ता हमी, विद्याशाखा विकास आणि संशोधन) डॉ. ए. एन. सूर्यकर, आदी मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचा समारोप बक्षीस आणि प्रमाणपत्र वितरण समारंभाने झाला. ज्यामध्ये डीपीयू युनिट ऑफ इंटरनॅशनल चेअर इन बायोएथिक्स (ICB) च्या स्टुडंट्स विंगला प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यात इरा गोरे हीने सर्वोत्कृष्ट विद्यार्थीनीचा मान पटकावला, तर स्टुडंट्स विंगचा प्रमुख आकुल बी भुयान विजेता ठरला.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments