Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedतृतीयपंथीयांच्या समस्यांबाबत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक संपन्न*

तृतीयपंथीयांच्या समस्यांबाबत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक संपन्न*

*
पुणे दि.२६: तृतीयपंथीयांच्या समस्या, तक्रारीसंदर्भात गठीत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.

या बैठकीत तृतीयपंथी व्यक्तींसाठी विशेष शिबिराचे आयोजन करुन त्यांना मोफत तृतीयपंथीय ओळखपत्र देणे. जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत शिधापत्रिकेचा लाभ देणे. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत निवृत्तीवेतनाचा लाभ देणे. उदरनिर्वाहासाठी व स्वयंरोजगारासाठी तसेच उद्योजक निर्माण करण्याकरीता विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करणे. तृतीयपंथी व्यक्तींच्या गरिमा गृहासाठी भाडे तत्वावर शासकीय कार्यालयांची इमारत उपलब्ध करुन घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात विशेष अभियान राबवून १३६ तृतीयपंथी मतदारांची मतदार यादीमध्ये नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे दिली.
00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments