Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorized▪️अहिल्यादेवी यांचे कार्य अतुलनीय▪️ डॉ.सदानंद मोरे

▪️अहिल्यादेवी यांचे कार्य अतुलनीय▪️ डॉ.सदानंद मोरे

पुणे – अहिल्यादेवीं यांचे कार्य अतुलनीय असून उत्तम प्रशासक आणि उत्तम राज्यव्यवस्था त्यांनी अतिशय शांततामय मार्गाने केली.असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

सोशल स्टडी फाउंडेशन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या वतीने अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त मोरे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झाले त्यावेळी ते बोलत होते. ‘क्वीन ऑफ इन्डॉमिटेबल स्पिरिट अहिल्याबाई होळकर’ या लेखिका चिन्मयी जोशी मुळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र येथे झाले.

अहिल्याबाई सत्वगुणी होत्या असे सांगून त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा चढता आलेख मोरे यांनी मांडला.सत्वगुणासोबत रजोगुण हा अहिल्यादेवी यांचा गुण त्यांना सतत कर्म करत राहण्यासाठी कार्यमग्न ठेवण्यास आवश्यक ठरला.मनाचे संतुलन साधत अहिल्यादेवी यांनी स्थितप्रज्ञता राखली. सुख आणि दुःख त्यांनी सम बुद्धीने पेलले.सर्वांसाठी त्या कायम आदरणीय राहिल्या. ब्रिटिशांनी सुद्धा त्यांच्या कार्याचा गुण गौरव केला आहे. शांततामय मार्गाने देशाच्या सर्व दिशांना त्यांनी लक्षपूर्वक काम केले. त्यात धर्म स्थळे, अन्नछत्रे, विहिरी यांची निर्मिती केली. सम्राट अशोकानंतर खरोखर अशा कामांसाठी, विशेष कार्यासाठी अहिल्यादेवी यांचे नाव अग्रेसर आहे. साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाच्या काळात अहिल्यादेवी यांच्या कार्याबद्दल होळकरशाहीचे १४ खंड प्रकाशित करू शकलो यांचा अभिमान आणि समाधान आहे असेही ते म्हणाले.
यावेळी सोशल स्टडी फाऊंडेशनचे प्रमोद गोसावी यांनी पुस्तकाची माहिती आणि निर्मिती प्रक्रिया याबाबत माहिती दिली. अध्यासनाच्या वतीने अहिल्यादेवी यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षात एकूण तीन पुस्तके प्रकाशित होणार असून या पुस्तकाचे ऑडियो बुक प्रसिद्ध झाले आहे असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांचे क्षिजित विस्तारावे यासाठी अहिल्यादेवी यांचे चरित्र किशोर वयीन मुलांसाठी सुद्धा प्रकाशित करण्यात येणार आहे. असेही ते म्हणाले.
यावेळी अध्यासन आणि विवेक विचार मंचच्या वतीने ऋषिकेश सकनुर आणि विजय दरेकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
प्राजक्ता परकाळे यांनी प्रास्ताविक केले. निलेश धायरकर यांनी सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments