पुणे, ३१ मार्च २०२४ : कमिन्स इंडिया लिमिटेडच्या संचालक मंडळाने ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व आर्थिक वर्षाच्या निकालांना नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजुरी दिली.३१ मार्च २०१४ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत एकूण विक्रीमध्ये गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत २० टक्के वाढ झाली असून ती २२६९ कोटी रूपयांपर्यंत पोचली आहे. करपश्चात (निव्वळ) नफा गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत ७६ टक्क्यांनी वाढून ५६२ कोटी रूपयांवर पोचला आहे. ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ टक्के वाढ होऊन ती ८८१६ कोटी रूपयांपर्यंत पोचली आहे, तर करपश्चात नफा ४७ टक्क्यांनी वाढून १६६१ कोटी रूपयांपर्यंत पोहचला आहे.
कमिन्स इंडिया लिमिटेडचे ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर
RELATED ARTICLES


