पुणे,३ जून २०२४ : तांत्रिक प्राविण्याद्वारे कार्यक्षमता वाढविण्यावर धोरणाचा आपला एक भाग म्हणून क्राईस्ट (डीम्ड विद्यापीठ) पुणे लवासा येथे एनडीआरएफच्या जवानांकरिता डिजिटल क्षमता या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. हा सहयोगात्मक उपक्रम डेटा सायन्स विभाग यांसह विद्यापीठाच्या सॉफ्टवेअर संशोेधन आणि विकास केंद्र असलेल्या क्राईस्ट इन्फोटेक यांच्या तर्फे आयोजित करण्यात आला होता. या सत्रांमध्ये एनडीआरएफच्या प्रशासकीय व कामकाज प्रक्रियेच्या आधुनिकीकरणासाठी महत्त्वाच्या असलेल्या कॅनव्हा, एक्सेल,पॉवर पॉईंट,चॅट जीपीटी,मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड या सॉफ्टवेअर साधनांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.कार्य प्रवाहामध्ये अखंडता आणि तांत्रिक सशक्तीकरणाद्वारे दैनंदिन कामकाजामध्ये एकूण परिणामकारकता वाढविणे हा या सत्रांचा उद्देश्य होता.तज्ञ परीक्षकांनी मार्गदर्शन करत सहभागींना ही नवीन कौशल्ये त्यांच्या व्यावसायिक कामकाजात अखंडपणे समाकलित करण्यास मदत होण्यासाठी या सत्रांचा फायदा होणार आहे. ही कार्यशाळा शैक्षणिक उपक्रमांद्वारे सामाजिक योगदानासाठी क्राईस्ट विद्यापीठाच्या वचनबध्दतेला अधोरेखित करते.
क्राईस्ट विद्यापीठ तर्फे एनडीआरएफ जवानांकरिता डिजिटल क्षमता विषयावर दोन दिवसीय शिबिर संपन्न
RELATED ARTICLES


