नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर तर्फे परिचारिका सप्ताह 2024 साजरा

तारां कित Avatar

पुणे, ३ जून २०२४ : नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर तर्फे नुकतेच परिचारिका सप्ताह 2024 निमित्त ‘दिल की बात विथ पॅशन फायर’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिचारिकांच्या पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी, भारत आणि जगभरातील नर्सिंग क्षेत्रातील नेतृत्वाशी संवाद साधणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. जॉइंट कमिशन इंटरनॅशनल, यूएसएचे सर्वेयर जॉन सेल, इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स येथील नर्सिंग सर्व्हिसच्या प्रमुख अर्पिता मोंडल,टीजीआयएनच्या उपप्राचार्य व प्राध्यापिका आणि एमयूएचएसच्या पहिल्या नर्सिंग डीन डॉ. श्रीलेखा राजेश,कोलकाता येथील टाटा मेडिकल सेंटरच्या सहाय्यक प्राध्यापक व मिसेस इंडिया स्पर्धेत रायझिंग स्टार ट्रॉफी पटकावणाऱ्या श्रीपर्णा गिरी यांनी परिचारिकांशी संवाद साधला आणि आपल्या प्रवासाबद्दल सांगितले. नोबल हॉस्पिटल, पुणेच्या मुख्य नर्सिंग अधिकारी सोनिया मॅथ्यू आणि गुणवत्ता आणि नर्सिंग सेवा विभागाच्या संचालक तृप्ती नंदा यांनी सत्राचे संचालन केले.
नर्सिंग व्यवसायाची व्याप्ती खूप मोठी आहे. चिकाटी, सांघिक कार्य, लवचिकता, सहकाऱ्यांना पाठिंबा, शिकण्याची इच्छा यांसारख्या क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या गोष्टींचे महत्त्व यावेळी तज्ज्ञांनी अधोरेखित केले.

यूएस एअरफोर्स मेडिकल सर्व्हिसेसमध्ये नर्स म्हणून काम केलेल्या व जॉइंट कमिशन इंटरनॅशनल, यूएसएचे सर्वेयर जॉन सेल हे दृकश्राव्य माध्यमातून परिचारिकांना संबोधित करताना म्हणाले की, रुग्णांना वैद्यकीय समस्या निर्माण झाल्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये पोहचणे आणि उपचार या सर्व प्रवासात त्यांच्याशी सर्वाधिक संवाद होतो तो परिचारिकांसोबत. केवळ उपचारच नव्हे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवणाऱ्या कुटुंबाला देखील त्या मानसिक आधार देत असतात.

ते पुढे म्हणाले की, सांघिक कार्य, रुग्णांप्रती असलेली समर्पितता त्याचबरोबर टीममधील एकमेकांबरोबर असलेली बांधिलकी यामुळे रुग्णांना सर्वोत्तम संभाव्य परिणाम दिसून येऊ शकतात.

नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की,जागतिक पातळीवर आरोग्यसेवेत हॉस्पिटलसाठी गुणवत्ता आणि उत्कृष्टतेचे सर्वोच्च मानक म्हणून जेसीआय गोल्ड सील ओळखले जाते आणि हे प्राप्त करण्यासाठी नर्सिंग टीम उच्च प्रशिक्षित असणे गरजेचे असते. नोबल हॉस्पिटलची नर्सिंग टीम ही या जागतिक मानकांनुसार आपली सेवा देत असून अशा समर्पित टीमचा आम्हाला अभिमान आहे.

आमचे प्रोटोकॉल/कार्यपध्दती जागतिक स्तरावर कार्यरत असणाऱ्या व पुराव्या आधारित वैद्यकीय पध्दतींच्या बरोबरीने आहे.जागतिक सेवा देण्याच्या आकांक्षा बाळगणारी कोणतीही परिचारिका ही खात्री बाळगू शकेल की,नोबल हॉस्पिटलच्या नर्सिंग टीम सोबत जोडले जाऊन जगात कुठेही सेवा देता येईल अशा सक्षम बनविणाऱ्या जेसीआय मानकांच्या आधारित असणारा कार्यक्रम त्यांना अनुभवता येईल.

Tagged in :

तारां कित Avatar