ली ट्रॅव्हेन्यूज टेक्नॉलॉजी लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री 10 जून 2024 पासून सुरू

तारां कित Avatar

प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या (“इक्विटी शेअर्स”) प्रति इक्विटी शेअरसाठी 88 रुपये ते 93 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.
बोली/ऑफर सोमवार 10 जून 2024 रोजी खुली होईल आणि बुधवार 12 जून 2024 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख शुक्रवार 07 जून 2024 असेल
बोली किमान 161 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 161 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल

5 जून 2024: ली ट्रॅव्हेन्यूज टेक्नॉलॉजी लिमिटेड (“ईक्सीगो” किंवा “कंपनी”) ची इक्विटी शेअर्ससाठी प्राथमिक समभाग विक्रीशी संबंधित बोली/ऑफर 10 जून 2024 पासून सुरू होत आहे.

प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सच्या एकूण ऑफर साईज मध्ये 1,200.00 दशलक्ष रु. पर्यंतचे फ्रेश इश्यू (“फ्रेश इश्यू”) आणि विक्री समभागधारकांकडून (खाली परिभाषित केले आहे) (“ऑफर फॉर सेल”) प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सची 66,677,674 पर्यंतची ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे.

प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख शुक्रवार 07 जून 2024 असेल. बोली/ऑफर विक्रीसाठी सोमवार 10 जून 2024 रोजी खुली होईल आणि बुधवार 12 जून 2024 रोजी बंद होईल.

प्रति इक्विटी शेअरसाठी 88 रुपये ते 93 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 161 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 161 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.

ऑफर फॉर सेल मध्ये सैफ पार्टनर्स इंडिया लिमिटेडतर्फे 19,437,465 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, पीक XV पार्टनर्स इन्व्हेस्टमेंट V (आधीचे SCI Investments V) तर्फे 13,024,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, आलोक बाजपेयी यांच्या तर्फे 11,950,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, रजनीष कुमार यांच्यातर्फे 11,950,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, मायक्रोमॅक्स इन्फरमेटीक्स लिमिटेड तर्फे 5,486,893 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, प्लासिड होल्डीग्ज तर्फे 3,048,375 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, मॅडीसन इंडिया ऑपारच्युनीटी ट्रस्ट फंडचे ट्रस्टी म्हणून कॅटलिस्ट ट्रस्टीशीप लिमिटेड (आधीचे माईलस्टोन ट्रस्टीशीप सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड) तर्फे 1,333,513 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि मॅडीसन इंडिया कॅपिटल एचसी (एकत्रितपणे “विक्री समभागधारक”) यांच्या वतीने 447,428 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आहेत.

इक्विटी शेअर्स 4 जून 2024 रोजी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“RHP”) द्वारे नवी दिल्ली येथे रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, दिल्ली अँड हरयाणा सह सादर केले जात असून बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) वर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) (“SEBI ICDR Regulations”) नियम 31 च्या 19(2)(ब) सुधारित नियमावलीनुसार ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या 6(2) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डींग प्रक्रीयेद्वारे जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी ऑफरच्या 75 % पेक्षा कमी नसलेले समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील 60 टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (“Anchor Investor Portion”) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत”) राखीव करण्यात आलेल्या वाटप किंमतीइतक्या किंवा अधिक किंमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. वाटप कमी झाल्यास किंवा मुख्य गुंतवणूकदार भागात नॉन-अलोकेशन भाग असल्यास शिल्लक इक्विटी शेअर्सची नेट QIB भागात भर पडेल (मुख्य गुंतवणूकदार भाग वगळून).

ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % (मुख्य गुंतवणूकदार भाग वगळून) फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. जर किमान 75% ऑफर QIB साठी उपलब्ध होऊ शकली नाही तर उर्वरित सर्व उपलब्ध निधी रिफंड केला जाईल.

तसेच, ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा अधिक नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. त्यापैकी बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध भागांपैकी एक तृतीयांश भाग 200,000 रुपयांपेक्षा जास्त आणि 1,000,000 लाख रुपयांपर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि दोन तृतीयांश भाग 1,000,000 लाख रुपयांपेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी वर नमूद केलेल्या कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग दुसऱ्या इतर उप-श्रेणीतील गुंतवणूकदारांना वाटप केलेला असू शकतो.

पुढे, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या किमतीवर किंवा त्याहून अधिक मान्यताप्राप्त बोली साठी हे लागू असेल. तथापि, म्युच्युअल फंडांची एकूण मागणी निव्वळ QIB भागाच्या 5% पेक्षा कमी असल्यास, म्युच्युअल फंड भागामध्ये वाटपासाठी उपलब्ध शिल्लक इक्विटी समभाग QIBs च्या उर्वरित QIB भागाच्या प्रमाणात (मुख्य गुंतवणूकदार भाग वगळून) वाटपामध्ये जोडले जातील.

पुढे, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या 10% पेक्षा जास्त नसलेला भाग रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना (“रिटेल श्रेणी”) उपलब्ध होईल. ऑफर प्राइस इतक्या किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या बोलीवर हे लागू असेल. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. तपशीलांसाठी, RHP च्या पृष्ठ 487 वरील “ऑफर प्रक्रिया” पहा.

अॅक्सीस कॅपिटल लिमिटेड, DAM कॅपिटल अॅडव्हायजर्स लिमिटेड आणि जेएम फायनान्शीयल लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (एकत्रितपणे “BRLMs”) आहेत.

येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइझ संज्ञांचा समान अर्थ RHP मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणेच असेल.

Tagged in :

तारां कित Avatar

More Articles & Posts