राष्ट्रीय ५ जून २०२४- स्विगी डाइनआऊटने कलिनरी सेशन्स नावाचा एक उपक्रम सुरू केला आहे. दोन वेळा मिशलिन स्टार शेफ अशी उपाधी मिळवणारे शेफ अतुल कोचर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला आहे. हा कार्यक्रम पुण्यातील कोनरॅड येथे ७ आणि ८ जूनला होणार आहे. याआधी चेन्नई आणि हैदराबादला हा कार्यक्रम घेण्यात आला होता.
जागतिक पातळीवर नाव कमावणाऱ्या निवडक शेफ मध्ये अतुल कोचर यांचा समावेश आहे. पदार्थाची सजावट, आणि एकूणच खाद्यपदार्थांची आवड यासाठी ते ओळखले जातात. शेफ्स टेबल या उपक्रमासाठी त्यांनी निवडलेले पदार्थ हेही पदार्थ सजवण्याच्या पद्धतीचा उत्तम नमुना आहे. त्यात प्रादेशिक घटक आणि जगभरातील फ्लेवर्स यांचा संगम आहे. कुनफा पेस्ट्री, रॉयल जर्सी पोटॅचो क्रोकेट्स ते अतुल कोचर यांची खासियत असलेलं तंदुरी चिकन टिक्का पाय, चिल्का लेक प्रॉन्स प्रत्येक पदार्थ हा फाईन डायनिंगचा नमुना आहे. प्रत्येक घासागणिक शेफ कोचर यांची पदार्थ तयार करण्याबद्दलची तळमळ दिसून येते. त्यांनी केलेला प्रत्येक पदार्थ हा चव आणि त्यातून मिळणारा आनंद यांचा अनोखा संगम आहे.
शेफ कोचर यांच्या मते, “भारतातील पाककला क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. लोकांना आता जागतिक पातळीवरचे अनुभव घ्यायचे आहेत. त्यांना नवनवीन प्रयोग करायचे आहेत आणि फाइन डायनिंगचा आनंद घ्यायचा आहे. स्विगी डाइन आऊटच्या कलिनरी सेशनचा मेन्यू याच उत्साहवर्धक बदलाचं द्योतक आहे, तसंच पाकललेतील नवीन बदलांचा हा उत्सव आहे. पाककला एक वेगळ्याच पातळीवर नेणाऱा हा मेन्यू सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे आणि त्यामुळे खवय्यांना अविस्मरणीय अनुभव घेण्याची ही नामी संधी आहे.”
पाककला केंद्रस्थानी असलेल्या स्विगीच्या डाइनआऊटचा अनुभव घ्या. या उपक्रमासाठी मर्यादित जागा आहेत. प्रत्येक सत्रात एक उत्तम अनुभव मिळण्याची खात्री आहे. त्यामुळे आपली जागा आजच राखून ठेवा. तुमचा जेवणाबद्दलचा अनुभव नक्कीच समृद्ध होईल.
याबद्दल बोलताना कोनरॅडचे जनरल मॅनेजर अभिषेक सहाय म्हणाले, “शेफ अतुल कोचर त्यांचे पदार्थ फाइव्ह कोर्सच्या टप्प्यात झीरा येथे दाखवणार आहेत याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. पुण्यातील कोनार्डच्या ग्राहकांना उत्तम अनुभव देण्याच्या कटिबद्धतेचाच हा एक भाग आहे.
या कार्यक्रमाचे तिकीट खालील लिंकवर क्लिक करून विकत घेऊ शकता
https://in.bookmyshow.com/activities/culinary-sessions-with-chef-atul-kochhar/ET00398044
दावत, नेब्युला बाय टायटन, ग्लेनफिडिश, (लाईफस्टाईल पार्टनर), वेदिका(हायड्रेशन पार्टनर), कनिश्का (फुड क्युरेशन पार्टनर) हे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत


