Wednesday, September 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुरस्कार विजेते संशोधक आणि शिक्षणतज्ञ डॉ....

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुरस्कार विजेते संशोधक आणि शिक्षणतज्ञ डॉ. प्रशांत साठे : मएसो सिनियर कॉलेज तर्फे स्कूल कनेक्ट उपक्रमांतर्गत व्याख्यान

पुणे: आज पुण्यातच नव्हे तर संपूर्ण देशातील महाविद्यालये केवळ विद्यार्थ्यांसाठी प्रवेश केंद्र झाली आहेत. त्या ठिकाणी क्वचित वेळा विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती पाहायला मिळते. त्यामुळेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात आले आहे. यामध्ये केवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर भर न देता त्यांचा सर्वांगीण विकास करण्यावर लक्ष देण्यात आले आहे, असे मत पुरस्कार विजेते संशोधक आणि शिक्षणतज्ञ डॉ. प्रशांत साठे यांनी व्यक्त केले.

मएसो सिनियर कॉलेज आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्कूल कनेक्ट या उपक्रमांतर्गत डॉ. प्रशांत साठे यांचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. मएसो सिनियर कॉलेज चे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य, उप प्राचार्या डॉ. पूनम रावत यावेळी उपस्थित होते.

डॉ. प्रशांत साठे म्हणाले, शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये गेल्यानंतर आपले करिअर करताना आपल्यासमोर कोणती आव्हाने आहेत आणि त्यामधून आपण कोणत्या संधी शोधू शकतो याची माहिती घेण्यासाठी विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती निश्चितच घ्यायला हवी. चुकीची माहिती,अफवांवर विश्वास ठेवू नये. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमुळे दहावी आणि बारावी बंद होणार नाही तसेच त्यांचे महत्त्वही कमी होणार नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर लक्ष केंद्रित करते.

विद्यार्थी कॉलेजमध्ये किती वेळा जातो आणि तो प्रत्यक्ष किती विषयांच्या वर्गाला उपस्थित राहतो याबद्दल आज महाविद्यालयीन क्षेत्रांमध्ये अत्यंत उदासीनता दिसून येते. परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्याचे करिअर करताना त्याच्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये ही करिअर करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे केवळ मार्क मिळवणे हाच विद्यार्थ्यांचा उद्देश राहणार नाही, तर आपल्याला आवश्यक असणारी माहिती मिळवणे आणि त्याचा आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये कसा उपयोग करून घेता येईल याचा मेळ घालता येईल यातूनच आपल्याला उद्याचे मजबूत राष्ट्र घडविणारे नागरिक निर्माण करता येतील. असेही डॉ. प्रशांत साठे यांनी यावेळी सांगितले.

—

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments