पिंपरी-चिंचवड मनपा क्षेत्रात- विकसित भारत संकल्प यात्रेस नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद..

तारां कित Avatar

1पिंपरी, दि. २७ डिसेंबर २०२३ :- विकसित भारत संकल्प यात्रेला पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ३२ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी या यात्रेला भेट देऊन विविध योजनांचा लाभ घेतला आहे. यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक असून या उपक्रमाबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

भारत सरकारच्या विविध महत्वाकांक्षी योजनांचा लाभ वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी भारत सरकारने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही मोहीम संपुर्ण देशभर सुरू केली. पिंपरी चिंचवड शहरात २८ नोव्हेंबर पासून ही यात्रा सुरू झाली. आतापर्यंत शहरातील ५९ ठिकाणी या यात्रेने भेट दिली असून नागरिकांना विविध लाभांचे वाटप केले आहे. यात्रेच्या वाहनाद्वारे नागरिकांना देण्यात येणाऱ्या लाभांमध्ये प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजना, आयुष्मान भारत कार्ड, आधार कार्ड अद्यावतीकरण, उज्ज्वला गॅस योजना अशा विविध योजनांचा समावेश असून लाभ देण्यासोबत महापालिकेच्या वतीने आरोग्य शिबीराचेही आयोजन केले जात आहे.

थेरगाव येथील डांगे चौक या ठिकाणी पार पडलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमास खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य सिद्धेश्वर बारणे तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी आत्मनिर्भर भारतासाठी पंचप्रण शपथ घेतली.

शहरात २८ डिसेंबर रोजी कासारवाडी येथील विसावा हॉटेल चौक येथे सकाळी १० वाजता, नवी सांगवी येथील काळूराम जगताप बॅडमिंटन हॉल येथे दुपारी ३ वाजता तर २९ डिसेंबर रोजी नटसम्राट निळु फूले सभागृह येथे सकाळी १० वाजता, जुनी सांगवी येथील पी.डब्ल्यु.डी मैदान येथे दुपारी ३ वाजता ही यात्रा भेट देणार आहे. शेवटच्या दिवशी म्हणजे ३० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता गजानन महाराज मार्केट या ठिकाणी ही यात्रा भेट देणार आहे.

नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या विविध कक्षांना भेट द्यावी तसेच विविध योजनांची माहिती घेऊन लाभ घ्यावा असे सांगून अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य शिबीराचेही आयोजन या यात्रेत करण्यात येत असून विविध आरोग्यविषयक तपासण्याही नागरिकांनी करून घ्याव्यात असे आवाहन केले.2+00:00″>

Tagged in :

तारां कित Avatar