Wednesday, September 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedसैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये भरतीसाठी २० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये भरतीसाठी २० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

*

पुणे, दि. ६: सैनिकी मुलांच्या-मुलींच्या वसतिगृहाकरिता अशासकीय कर्मचाऱ्यांची निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून इच्छुक माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी व इतर नागरिकांनी २० जूनपर्यंत संबंधित वसतिगृहात अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पर्वती येथील सैनिकी मुलांच्या वसतिगृहामध्ये सहायक वसतिगृह अधीक्षक ३ (पुरूष) मानधन २४ हजार ४७७ रुपये, स्वयंपाकी ८ (महिला) मानधन १३ हजार ९२४ रुपये, सफाई कर्मचारी ३ (महिला/पुरूष) मानधन १३ हजार ८९ रुपये, माळी १ (पुरूष) मानधन १३ हजार ८९ रुपये, पहारेकरी १ (पुरूष) मानधन २० हजार ८८६ रूपये तसेच नवी पेठ येथील सैनिकी मुलींच्या वसतिगृहामध्ये सहायक वसतिगृह अधीक्षिका ३ (महिला), मानधन २४ हजार ४७७ रुपये, स्वयंपाकी ७ (महिला) मानधन १३ हजार ९२४ रुपये, सफाई कर्मचारी २ (महिला) मानधन १३ हजार ८९ रुपये, माळी १ (महिला/पुरूष) मानधन १३ हजार ८९ रुपये व पहारेकरी १ (पुरूष) मानधन २० हजार ८८६ रूपये अशी पदे भरण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी वसतिगृह अधीक्षक शेख अब्दुल (भ्र.ध्व. क्र. ७०२०४१०९५४) आणि वसतिगृह अधीक्षिका श्रीमती मंगला कांबळे (भ्र.ध्व. क्र. ९५१८३७४८६३) या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल एस.डी. हंगे (नि.) यांनी कळविले आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments