*
पुणे, दि. २८: विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून पुणे महानगरपालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या विविध योजनांची नागरिकांना आकर्षक एलईडी वाहनांद्वारे माहिती देण्याबरोबरच त्या योजनेचा लाभही देण्यात आला आहे.
पुणे शहरात हिराबाग एसआरए, शुकवार पेठ, ज्ञानप्रबोधनी चौक, फडके हौद, सातोटी चौक, शुभनशाह दर्गा, सहकार मंडळ गणेश पेठ, मीरा बाजारपेठ, घोरपडी पेठ, शितलादेवी चौक, अग्निशमन कार्यालय, भवानी पेठ, रामोशी गेट, एसपीएम शाळा, सेनादत्त पोलीस चौकी जवळ, संत गाडगे महाराज कॉलनी, कोरेगाव पार्क, बर्निंग घाट कॉलनी येथे कार्यक्रम घेण्यात आले आहेत. या यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्र शासनाच्या विविध योजनांचे स्टॉल लावण्यात येत असून नागरिकांना योजनांची माहिती देणारी पुस्तिकाही देण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, तृतीयपंथी, विद्यार्थी आदी यात्रेत सहभागी होत आहेत. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजू नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये विशेषत: क्षयरोगी, सिकलसेल समस्येबाबत व्यक्तींची तपासणी करुन पुढील उपचाराबाबत मार्गदर्शनही करण्यात येत आहेत.
पुणे महानगरपालका कार्यक्षेत्रात २९ डिसेंबर रोजी लोहगाव बसस्थानक येथे सकाळी १०.३० वा., श्रावस्ती नगर घोरपडी येथे सकाळी १०.३० वा., शांतीनगर, येरवडा व विकास नगर घोरपडी येथे दु.३ वा., ३० डिसेंबर रोजी चुडामण तालिम चौक येथे सकाळी १०.३० वा. चमन शाह चौक येथे दु.३ वा, आणि ३१ डिसेंबर रोजी गुरुनानकनगर येथे सकाळी १०.३० वा. चमन शाह चौक येथे दु.३ वा. भिमाले संकुल येथे यात्रा येणार असून नागरिकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे महानगरपालकेचे उपायुक्त नितीन उदास यांनी केले आहे.