Home
About Us
Advertisement
Career
Twitter
Instagram
Facebook
Spotify
Pinterest
Reddit
तारांकित
Search
Uncategorized
Uncategorized
आग्य्राहून सुटका स्मृतिदिन सोहळ्यानिमित्त पुण्यात पालखी सोहळा रविवारी (दि. १०) श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ.पुणे, आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन ; राजगडावर होणार मुख्य सोहळा पुणे : श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ.पुणे, आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आग्य्राहून सुटका स्मृतिदिन सोहळा, किल्ले राजगड’ गेली ४२ वर्षे साजरा करण्यात येत आहे. यंदाचे सोहळ्याचे हे ४३ वे वर्ष आहे. यावर्षी पुण्यामध्ये लालमहाल येथे रविवार, दि.१० डिसेंबर २०२३ सकाळी ११ वाजता लाक्षणिक पालखी प्रस्थान सोहळा होईल.ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. यावेळी पोवाडा व ढोल वादन सादरीकरण दि पूना स्कूल अॅन्ड होम फॉर ब्लाइंड ट्रस्ट यांचे विद्यार्थी करतील. एच.व्ही.देसाई महाविद्यालयचे इतिहास विभाग प्रमुख गणेश राऊत यांचे शिवचरित्रावर व्याख्यान देखील होणार आहे. तसेच सालाबादप्रमाणे यावर्षी दि. १६ व १७ डिसेंबर २०२३ रोजी ‘आग्य्राहून सुटका स्मृतिदिन किल्ले राजगड पाल खु. येथील खंडोबाचा माळ व गडावरती साजरा करण्यात येत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर,वक्ते, इतिहासकार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.किल्ले राजगड खंडोबा माळावर, पाल गाव शनिवार दि.१६ डिसेंबर २०२३ सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील. स्थिर वादन, मर्दानी खेळ होतील. सायली गोडबोले-जोशी यांचा राजमाता जिजाऊ नाट्याविष्कार सादर होईल. अॅड. रवींद्र यादव यांचे शिव व्याख्यान होईल. किल्ले राजगड पद्मावती माता मंदिर येथे शनिवारी गड जागरण कार्यक्रमांतर्गत आग्र्याहून सुटका याविषयी प्रास्ताविक भाषण होईल व व्याख्यात्यांची व्याख्याने होतील.रविवार, दि. १७ डिसेंबर २०२३ सकाळी : ६.०० वा. किल्ले राजगड येथे सूर्योदयाला ध्वजारोहण होईल. किल्लेदार सुर्यकांत भोसले यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण व पद्मावती देवीचे पूजन होणार आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज पालखी सोहळा ढोल, ताशांच्या गजरात पाली दरवाजा – सदर – पद्मावती माता मंदिर असा होणार आहे. तरी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
December 9, 2023
.
तारां कित
Uncategorized
खेलो इंडिया महिला रग्बी लीग स्पर्धेत कोल्हापूर अ संघाला विजेतेपद पुणे, 8 डिसेंबर 2023: रग्बी इंडिया, स्पोर्टस ॲथोरिटी ऑफ इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या खेलो इंडिया महिला रग्बी लीग स्पर्धेत 18 वर्षाखालील मुलींच्या गटात कोल्हापूर अ संघाने विजेतेपद संपादन केले.श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत कोल्हापूर अ संघाने नाशिक संघाचा ४५-०० असा एकतर्फी पराभव करून विजेतेपद पटकावले. विजयी संघाकडून नम्रता १५, नेहा १०, तृप्ती १०, समृद्धी ५, अनुष्का ५) यांनी सुरेख कामगिरी केली. याआधीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कोल्हापूर अ संघाने मुंबई स्टेकर्स संघाचा २४-०५ असा तर, नाशिक संघाने ठाणे अ संघाचा २६-०५ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबई स्टेकर्स संघाने ठाणे अ संघाचा ५३-०५ असा पराभव तिसरा क्रमांक पटकावला.स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र सरकार सह संचालक सुधीर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.निकाल: १८ वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:कोल्हापूर अ: २४ (समृद्धी १०, नम्रता ५, अनुष्का ५, नेहा ४) वि.वि. मुंबई स्टेकर्स: ५ (कायरा ५);नाशिक: २६ (ईश्वरी १०, स्वाती ११, स्नेहल ५) वि.वि.ठाणे अ: ५ (अदिती ५)अंतिम फेरी: कोल्हापूर अ: ४५ (नम्रता १५, नेहा १०, तृप्ती १०, समृद्धी ५, अनुष्का ५) वि.वि. नाशिक: ०.तिसरे आणि चौथे स्थान:मुंबई स्टेकर्स: ५३ (कायरा १५, लावण्या 10, सांचल 5, रुतुजा 5) वि.वि.ठाणे अ: ५(अदिती 5).
December 9, 2023
.
तारां कित
Previous Page
1
…
1,355
1,356
1,357