Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedकॅनरा रोबेको तर्फे ‘कॅनरा रोबेको बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड’

कॅनरा रोबेको तर्फे ‘कॅनरा रोबेको बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड’

पुणे, 12जुलै 2024: भारताची दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जुनी मालमत्ता व्यवस्थापन संस्था असलेल्या कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाने आज कॅनरा रोबेको बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड हा ओपन-एंडेड व मालमत्तेचे विविध गुंतवणूक गटांमध्ये गतीशीलतेने इष्टतम वाटप करणारा फंड सुरू केल्याची घोषणा केली. फंडाची न्यू फंड ऑफर अर्थात एनएफओ १२ जुलै २०२४ रोजी खुली होईल आणि २६ जुलै २०२४ रोजी बंद होईल.

 

फंडाद्वारे मालमत्तेच्या केल्या जाणाऱ्या ढोबळ वाटपामध्ये ६५% किंवा त्याहून अधिक रक्कम इक्विटीजमध्ये गुंतवली जाईल. उर्वरित रक्कम डेब्ट आणि मनी मार्केट साधनांमध्ये गुंतवली जाईल.

 

“कॅनरा रोबेको बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड उत्पन्न निर्मितीबरोबर भांडवलातील दीर्घकालीन वाढीचे लक्ष्य समोर ठेवून इक्विटीज आणि डेब्टमधील मालमत्तेचे वाटप गतीशीलतेने बदलत राहील. इक्विटीमधील गुंतवणूकीमध्ये गतीशीलतेने बदल करण्याच्या पद्धतीच्या शोधात असलेल्या म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी हा फंड सुयोग्य ठरू शकेल.

 

कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाचे सीईओ श्री. रजनीश नरुला म्हणाले, २० वर्षांहून अधिक काळाच्या आकडेवारीवरून केलेल्या मूल्यमापनावर आधारित स्वमालकीच्या तीन-घटकीय मालमत्ता वाटप प्रारूपाचे मार्गदर्शन या फंडाद्वारे केल्या जाणाऱ्या मालमत्तेच्या इष्टतम वाटपाला (असेट अलोकेशनला) लाभणार आहे.

 

“कॅनरा रोबेको बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड हे एक असेट अलोकेशन प्रोडक्ट आहे, जे गुंतवणुकदारांचे पूर्वग्रह नाहीसे करण्यासाठी कंपनीच्या स्वत:च्या प्रारूपाच्या आधारे मालमत्तेचे इक्विटीमध्ये वाटप करेल. स्वमालकीच्या या प्रारूपामध्ये बाजारपेठेतील विविध परिस्थितींमध्ये असेट अलोकेशनचे एक सूत्र निश्चित करण्यासाठी ट्रेलिंग पी/बी ‘इक्विटी रिस्क प्रीमियम’ आणि ‘फॉरवर्ड पी/ई या तीन घटकांचा वापर केला जाईल.” कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाच्या इक्विटीज विभागाचे प्रमुख श्री. श्रीदत्ता भांडवलदार म्हणाले.

 

इक्वटीमधील गुंतवणूकीची निवड करताना हा फंड उद्योगक्षेत्र निर्धारित करण्यासाठी स्थूल आर्थिक घटकांचा प्राधान्याने विचार करणारा ‘टॉप-डाऊन’ दृष्टिकोन वापरेल तर स्टॉक्ससाठी आर्थिक क्षेत्रातील सूक्ष्म घटकांना प्राधान्य देणाऱ्या ‘बॉटम-अप’ दृष्टिकोनाचा अवलंब करेल. डेब्ट विभागामध्ये मालमत्तेचे वाटप करताना हा फंड सरकारी बॉण्ड्स आणि एएए श्रेणीच्या कॉर्पोरेट पेपर्समध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करेल, जेणेकरून स्थैर्य आणि तरलता राखली जावी. डेब्ट पोर्टफोलिओचे व्यवस्थापन गतीशील पद्धतीने केले जाईल, जेणेकरून उत्पन्नवृद्धीच्या विविध टप्प्यांमध्ये कुठे गैरमूल्यांकन झाले असेल तर ते चटकन लक्षात यावे.

 

“कॅनरा रोबेको बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंडा”चे वेगवान असेट अलोकेशन धोरण गुंतवणूकदारांना इक्विटी आणि डेब्ट यांमध्ये मालमत्तेचे इष्टतम वाटप वेगाने करण्याची संधी देते. या एनएफओ मध्ये २ खास वैशिष्ट्येही आहेत – यातील एक वैशिष्ट्य म्हणजे ऑटोस्विच, ज्यामुळे गुंतवणूकदारांना एनएफओच्या कालावधीदरम्यान निवडक डेब्ट योजनांमध्ये गुंतवणूक करता येते जिथे एनएफओच्या शेवटच्या चार दिवसांमध्ये संपूर्ण रक्कम एनएफओ मध्ये स्विच केली जाईल. शिवाय ज्यांना एनएफओ मध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करायची असेल त्यांना स्मार्ट एसटीपी च्या माध्यमातून विशिष्ट अंतराने केलेल्या ४ समान गुंतवणुकींच्या माध्यमातून गुंतवणूक करता येईल. रोख रकमेच्या गरजा पूर्ण करू शकणाऱ्या गुंतवणूकदारांसाठीचे समस्या समाधान म्हणून या प्रकारचा फंड उदयास येत आहे.” असे कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडच्या सेल्स अँड मार्केटिंग विभागाचे नॅशनल हेड श्री. गौरव गोयल म्हणाले.

 

कॅनरा रोबेको बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंडाच्या कामगिरीचे मूल्यमापन क्रिसिल हायब्रिड ५०+५- मॉडरेट इंडेक्सनुसार केले जाईल.

 

श्री. श्रीदत्ता भांडवलदार, श्री. एनेट फर्नांडेस, श्री. सुमन प्रसाद आणि श्री. अमित कदम हे कॅनरा रोबेको बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंडासाठी फंड व्यवस्था

पक असतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments