Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorized- कन्स्ट्रो २०२४ नामक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन...

– कन्स्ट्रो २०२४ नामक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन…

पिंपरी, दि. ३ जानेवारी २०२४ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र (पीआयईसीसी) ग्राउंड मोशी, पुणे येथे बांधकाम अभियांत्रिकी संशोधन फाउंडेशन, पुणे (PCERF) यांनी दि. ०४ ते ०७ जानेवारी २०२४ दरम्यान “कन्स्ट्रो २०२४” नामक १८ वे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आयोजित केले आहे. सदर प्रदर्शनांतर्गत जागतिक स्तरावरील तांत्रिक क्षेत्रातील पारंपारिक व अत्याधुनिक यंत्रसामुग्री, बांधकाम पध्दती यांचा समावेश आहे. यामध्ये गतिशीलता, गृहनिर्माण, ऊर्जा, शाश्वत विकास आणि नागरी पायभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत केले आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये नवनविन तंत्रज्ञान विकसित होत असताना त्याबाबतची माहिती अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध अभियंत्यांना तसेच शहरवासियांना ज्ञात असावी या दृष्टीने सदरचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. सदर प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत आहे.

सदर प्रदर्शनास जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments