Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोका-कोलाकडून २०२४ च्‍या दुसऱ्या तिमाहीचे निकाल सादर आणि जागतिक युनिट केस व्‍हॉल्‍युमसाठी...

कोका-कोलाकडून २०२४ च्‍या दुसऱ्या तिमाहीचे निकाल सादर आणि जागतिक युनिट केस व्‍हॉल्‍युमसाठी लक्ष्‍य निर्धारित

नवी दिल्ली, जुलै २४, २०२४ – कोका-कोला कंपनीने आपल्‍या २०२४ च्‍या दुसऱ्या तिमाहीच्‍या निकालांमध्‍ये उद्योगामधील सातत्‍यपूर्ण गतीसह अनेक विकास संधी निदर्शनास आणल्‍या. “आम्‍हाला आमच्‍या दुसऱ्या तिमाहीच्‍या निकालांमधून प्रेरणा मिळाली आहे, ज्‍यांनी बदलत्या लँडस्‍केपमध्‍ये प्रबळ कामगिरी आणि कार्यसंचालन उत्‍पन्‍न वाढीची नोंद केली,” असे कोका-कोला कंपनीचे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी जेम्‍स क्विन्‍सी म्‍हणाले. “आमच्‍या बॉटलिंग सहयोगींसोबत सहयोगाने आम्‍ही आमच्या अत्‍यंत प्रभावी ऑल-वेदर धोरणाची अंमलबजावणी करणे सुरू ठेवले आहे आणि आम्‍हाला २०२४ साठी आमचे निर्धारित लक्ष्‍य व दीर्घकालीन उद्दीष्‍टे पूर्ण करण्‍याच्‍या आमच्‍या क्षमतेमध्‍ये विश्‍वास आहे.”

 

ते पुढे म्‍हणाले, “भारतातील व्‍यवसायाने या वर्षातील संथ सुरूवातीनंतर गती प्राप्‍त केली, ज्‍याचे श्रेय स्‍प्राइट व फॅण्‍टा, तसेच थम्‍स अप व माझा यांसारख्‍या प्रबळ स्‍थानिक ब्रँड्सना जाते. आमच्‍या विकासगतीमध्‍ये प्रबळ एण्‍ड-टू-एण्‍ड अंमलबजावणीमुळे आकारमानामध्‍ये दोन-अंकी वाढ झाली.”

 

भारतातील वैशिष्‍ट्ये:

 

· सुधारित रेव्‍हेन्‍यू ग्रोथ मॅनेजमेंट (आरजीएम) क्षमतांच्‍या माध्‍यमातून मूल्‍य वितरण: भारतात, कंपनी विस्‍तारित शेल्‍फ लाइफ असलेल्‍या वजनाने अत्‍यंत हलक्‍या व किफायतशीर बॉटलचा उपयोग करत नाविन्‍यपूर्ण पॅकेजिंगचा फायदा घेत आहे, ज्‍यामुळे पेये अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत आणि खर्च देखील कमी होत आहे. पॅकेज आता भारतातील अर्ध्‍याहून अधिक व्‍यावसायिक बेव्‍हरेज आऊटलेट्समध्‍ये उपलब्‍ध आहे आणि वर्षातील पहिल्‍या सहामाहीत ४०० दशलक्षहून अधिक व्‍यवहार करण्‍यात आले आहेत.

 

· युनिट केस व्‍हॉल्‍युममध्‍ये २ टक्‍क्‍यांची वाढ: विकसित बाजारपेठांमध्‍ये वाढ स्थिर होती, तर विकसनशील व उदयोन्‍मुख बाजारपेठांमध्‍ये मिड-सिंगल अंकी वाढ झाली, ज्‍याचे श्रेय भारत, ब्राझील आणि फिलिपाइन्‍समधील वाढीला जाते.

 

o आशिया पॅसिफिकमध्‍ये, युनिट केस व्‍हॉल्‍युम ३ टक्‍क्‍यांनी वाढले: स्‍पार्कलिंग फ्लेवर्स आणि ट्रेडमार्क कोका-कोलामधील वाढीमुळे भारत व फिलिपाइन्‍स वाढीसंदर्भात अग्रस्‍थानी होते.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments