मुंबई जुलै २०२४- जीएसकेने ‘अब इंडिया बनेगा ७ स्टार’ या त्यांच्या मल्टिचॅनेल कॅम्पेनची आज घोषणा केली आहे. भारताचं भविष्य त्यांच्या हातात आहे असा संदेश या कॅम्पेनच्या माध्यमातून पालकांना देण्यात येईल. १४ विविध रोगांविरुद्ध लढण्यासाठी ७ वेगवेगळ्या प्रकारच्या लसी मुलांना द्याव्यात यासाठी पालकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यात कांजिण्या, चिकनपॉक्स. हेपेटायटिस ए.बी, मेंदूज्वर, गोवर, गालगुंड, रुबेला, न्यूमोनिया, इन्फ्ल्यूएन्झा, घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, एचआयबी संसर्ग आणि पोलिओ या रोगांचा समावेश आहे.
इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स (IAP) ने १ ते २ वर्षांच्या मुलांसाठी ७ लसींची शिफारस केली आहे. त्यात कांजिण्या आणि हेपेटायटिसचे दोन डोज, मेंदूज्वराचा दुसरा डोज, एमएमआर लस, पीसीव्ही, डीटीपी, हिमोफिलस इन्फ्लुएन्झी टाइप बी आयपीव्हीचे बूस्टर डोज, आणि फ्ल्यूचा वार्षिक डोज यांचा समावेश आहे. पहिल्या वर्षापर्यंत भारतात योग्य पद्धतीने लसीकरण करतात मात्र पहिल्या वाढदिवसानंतर ही संख्या कमी होते. त्यामुळे भारतातील बहुसंख्य मुलं लसीकरणापासून वंचित राहतात.
जीएसकेच्या मेडिकल डायरेक्टर डॉ. शालिनी मेनन म्हणाल्या, “प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी ज्या रोगांचा प्रतिबंध लसीकरणाद्वारे करता येतो त्या लसी लहान मुलांच्या पहिल्या वाढदिवसानंतर घेणं गरजेचं आहे. लसीकरणाद्वारे प्रतिकारक्षमता वाढण्यास मदत होते आणि रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. लसीकरणामुळे अँटिमायक्रोबियल रेझिस्टंन्सचा धोका टळतो आणि त्यामुळे जास्त प्रमाणात अँटिबायोटिक्स घ्यावे लागत नाहीत. ७ मुख्य लसी घेतल्या की लहान मुलांचं १४ रोगांपासून संरक्षण होतं आणि त्यांची योग्य वाढ होते. १ ते २ वर्ष या वयोगटातल्या मुलांना लसीकरणाची किती गरज आहे हे आम्ही या कॅम्पेनद्वारे पालकांपर्यंत पोचवण्याचा आमचा उद्देश आहे.”
या कॅम्पेन फिल्म्सचा मुख्य उद्देश ७ लसी घेण्याच्या गरजेवर केंद्रित आहे. दोन वेगवेगळ्या फिल्म्समध्ये क्रिकेट, स्पेस स्टेशनचे मिशन डायरेक्टर असे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आहेत. ते आपलं महत्त्वाचं काम थांबवून मुलांनी ७ लसी घेतल्या की नाहीत हे तपासून पाहताना दिसत आहेत. त्यामुळे सध्याचे भारतातील स्टार लोक उद्याच्या स्टार लोकांच्या पालकांना संदेश देत आहेत, हे या फिल्ममध्ये दाखवण्यात आलं आहे. मुलांचं भविष्य सुरक्षित करणं हे कोणत्याही इतर कामापेक्षा महत्त्वाचं आहे तसंच या मुलांचं भवितव्य या ७ लसीतून मिळणाऱ्या सप्ततारांकित सुरक्षेत आहे असा संदेश या फिल्ममधून मिळतो.
हे कॅम्पेन विविध मिडिया प्लॅटफॉर्म उदा, टीव्ही, डिजिटल, सोशल मीडिया, रेडिओ, सीटीव्ही, आणि ओटीटीवर दाखवण्यात येणार आहे. पालकांनी बालरोगतज्ज्ञांकडे जाऊन वेळापत्रक समजून घ्यावं आणि योग्य माहितीसाठी MyVaccinationHub.in सारख्या प्लॅटफॉर्मचा आधार घ्यावा.
अॅड फिल्मसाठीच्या लिंक्स
सप्ततारांकित सुरक्षा- क्रिकेटर- ३५ सेकंद
https://www.youtube.com/watch?v=B-8GdFdE2mU
सप्ततारांकित सुरक्षा- अंतराळवीर- ३५ सेकंद
https://www.youtube.com/watch?v=oyNcEi
wvDlY


