पुणे, २८ जुलै २०२४ – तरुण शल्यचिकित्सकांमध्ये लॅप्रोस्कोपी आणि बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेतील कौशल्य आणि नैपुण्य वाढवण्याच्या उद्देशाने रूबी हॉल क्लिनिकतर्फे २७ आणि २८ जुलै २०२४ रोजी यशस्वीरित्या एका प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जगभरातील वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत प्राध्यापक आणि डॉक्टरांना एकत्र आणण्यात आले आणि विविध लॅप्रोस्कोपिक कौशल्य तंत्रे, प्रगत बॅरिएट्रिक प्रक्रिया आणि त्यांचे विशिष्ट सूचक याविषयी सखोल माहिती देण्यात आली.
प्रभावी स्थूलता व्यवस्थापनाची वाढती गरज पूर्ण करणाऱ्या एका व्यापक बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया कार्यक्रमाचाही उल्लेख रुबी हॉल क्लिनिकतर्फे या परिषदेत करण्यात आला. हा कार्यक्रम वजनाच्या समस्या, मधुमेह, उच्च रक्तदाब, सांधेदुखी, स्लीप एप्निया, पीसीओडी, वंध्यत्व इत्यादींसारख्या स्थूलतेशी संबंधित क्लिष्टतांचे व्यवस्थापन सुलभ करतो.
या परिषदेमध्ये १५० हून अधिक वैद्यकीय तज्ज्ञांचा सहभाग होता. याप्रसंगी ‘ओबेसिटी अँड मेटॉबॉलिक सर्जरी सोसायटी ऑफ इंडिया’चे (ओएसएसआय) अध्यक्ष डॉ. रणदीप वधावन म्हणाले की, हा उपक्रम केवळ शस्त्रक्रिया कौशल्य वाढवत नसून स्थूलपणासंदर्भात सर्वसमावेशक व्यवस्थापनाप्रती रुबी हॉल क्लिनिकची कटिबद्धताही अधोरेखित करतो. स्थूलता-संबंधित क्लिष्टतांसाठी विशेष व बहुशाखीय चिकित्सा प्रदान करण्यात रूबी हॉल क्लिनिकने खरोखर गुणवत्ता मापदंड प्रस्थापित केला आहे.
फिजिओथेरपी, योग्य आहार, जीवनशैलीतील बदल आणि स्थूलता समस्याग्रस्तांना सहाय्य यांसह शस्त्रक्रियापूर्व ते शस्त्रक्रियापश्चात मूल्यमापनापर्यंत प्रत्येक पैलूचा समावेश असलेला हा कार्यक्रम कल्याणकारी दृष्टिकोन प्रदान करतो. बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया, भूल तज्ज्ञांकडून विशेष मार्गदर्शन, एंडोस्कोपी आणि उच्च जोखीम असलेल्या रूग्णांसाठी विशेष अतिदक्षता विभागासारख्या सेवा या कार्यक्रमाद्वारे प्रदान केल्या जातात. अनुभवी शल्यचिकित्सक, आहारतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि परिचारिका यांचा समावेश असलेला बहुविद्याशाखीय संघ रुग्णांना उत्तम आरोग्याच्या प्रवासात मदत करण्यासाठी समर्पित आहे.
या परिषदेने स्थूलता-संबंधित परिस्थितींवर उपचार करण्यासाठी बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेची भूमिका आणि लवकर उपचाराचे महत्त्व अधोरेखित केले. स्थूलतेचे व्यवस्थापन करून, भविष्यातील मधुमेह, हृदयाच्या समस्या, सांधेदुखी आणि अगदी एंडोमेट्रियल, स्तन आणि स्वादुपिंडाचा कर्करोग यांसारख्या कर्करोगांचा धोका लक्षणीयरीत्या कमी केला जाऊ शकतो.
कार्यक्रमात बोलताना रुबी हॉल क्लिनिकमधील बॅरिएट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक शल्यचिकित्सक डॉ. केदार पाटील म्हणाले, “स्थूलतेवर बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेबाबत जागरूकता कमी आहे. स्थूलतेवर उपचार केल्यास संबंधित संभाव्य आजार नियंत्रित केले जाऊ शकतात. स्थूलतेवर उपचार करून, आपण मधुमेह, हृदयाच्या समस्या, सांधेदुखी आणि अगदी विशिष्ट कर्करोगांचा धोका कमी करू शकतो. रूग्ण त्यांच्या चांगल्या आरोग्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या सज्ज असतील, ही निश्चिती आमचे सर्वसमावेशक चिकित्सा प्रारूप करते. दीर्घकालीन काळजी घेण्यासाठी आम्ही सपोर्ट ग्रुप मीटिंग देखील आयोजित करत असतो.”
रुबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय विश्वस्त व चीफ कार्डिओलॉजिस्ट डॉ. पर्वेझ ग्रँट यांनी बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेतील उत्कृष्टतेसाठी रुग्णालयाच्या कटिबद्धतेवर भर दिला. “रुबी हॉल क्लिनिकमधील सर्वसमावेशक सेवा ही शस्त्रक्रियापूर्व तयारी आणि शस्त्रक्रियापश्चात निगेसह प्रगत शल्यचिकित्सा तंत्र एकत्रित करते. यामध्ये आहार मार्गदर्शन, फिजिओथेरपी आणि मानसिक आरोग्यासाठी मार्गदर्शन समाविष्ट आहे. प्रभावी आणि वैयक्तिक गरजेनुसार बॅरिएट्रिक उपचार शोधणाऱ्या व्यक्तींसाठी हा उपक्रम एक अनोखा व एकाच छताखाली सर्व सेवा प्रदान करून पुण्यातील एक अग्रगण्य प्रयत्नांचे प्रतिनिधित्व करतो. प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या अत्याधुनिक सुविधांसह, रुबी हॉल क्लिनिक प्रत्येक रुग्णासाठी सुरक्षित, अचूक आणि परिवर्तनकारी परिणाम देण्यासाठी वचनबद्ध आहे.”
रुबी हॉल क्लिनिक सातत्याने प्रशिक्षण आणि सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करून आरोग्यसेवा प्रगत करण्यासाठी समर्पित आहे. आरोग्यक्षेत्रातील तज्ज्ञांनी बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेचे मूल्य आणि स्थूलतेचा मुकाबला करणाऱ्या रुग्णांनी त्याची परिवर्तनीय क्षमता ओळखण्यासाठी कृती करावी, या आवाहनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.


