मुंबई, जुलै ३०, २०२४: महत्त्वाकांक्षा आणि उपलब्धता यामधील तफावत दूर करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू ठेवत टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या ऑटोमोबाइल उत्पादक कंपनीने आज दोन विशेष फंडिंग उपक्रम ‘विद्याधन’ आणि ‘उत्कर्ष’ यांच्या लाँचची घोषणा केली. या उपक्रमांच्या माध्यमातून पुणे, लखनौ, जमशेदपूर, धरवाड, सानंद आणि पंतनगर प्रांतांमधील प्लांट्ससह भारतभरातील उत्पादन केंद्रांमध्ये काम करणाऱ्या कंपनीच्या टेक्निशियन्सच्या मुलांना उच्च शिक्षणाची सुविधा देण्यात येईल.
‘विद्याधन’ उपक्रमांतर्गत, इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर मुलांना उच्च शिक्षण घेण्यास साह्य करण्यासाठी शैक्षणिक कर्ज सवलतीच्या दरांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. ‘उत्कर्ष’ उपक्रमासह मुली, ट्रान्सजेण्डर्स आणि विशेष विकलांग मुलांना ऑफर करण्यात आलेल्या वार्षिक स्कॉलरशिप्समधून अतिरिक्त फायदे मिळतील.
विद्याधन आणि उत्कर्ष उपक्रमांच्या लाँचची घोषणा करत टाटा मोटर्सचे चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर (सीएचआरओ) श्री. सिताराम कांडी म्हणाले, “प्रगती व विकासासाठी दर्जेदार शिक्षण महत्त्वाचे आहे. या उपक्रमांसह आम्ही उच्च शिक्षण अधिक प्रमाणात उपलब्ध करून देत आहोत आणि आमच्या मेहनती टेक्निशियन्सच्या भावी पिढीला त्यांची स्वत:ची, तसेच त्यांच्या पालकांची स्वप्ने साकारण्यास सक्षम करत आहोत. मुले इयत्ता दहावी व बारावीनंतर त्यांच्या आवडीच्या कोणत्याही शाखेमध्ये शिक्षण घेण्यावर लक्ष केंद्रित करू शकतात, जेथे पालकांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक साह्याबाबत कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. त्यांना योग्य पात्रता व कौशल्यांसह यशस्वी करिअर आणि जीवन घडवण्याच्या सर्वोत्तम संधी मिळतील.”
विद्याधन: उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल
‘विद्याधन’ हा शैक्षणिक कर्ज उपक्रम भावी पिढीला सक्षम करण्यासोबत त्यांना त्यांच्यामधील क्षमतांची जाणीव करून देण्यासाठी उच्च शिक्षणासंदर्भातील परिवर्तनात्मक समर्थक म्हणून सेवा देतो. पात्र टेक्निशियन्स जवळपास ७.५ लाख रूपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात, ज्यामध्ये देशांतर्गत शिक्षणासाठी जवळपास ९५ टक्के फी किंवा आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी जवळपास ८५ टक्के फी कव्हर केली जाईल. स्टेट बँक ऑफ इंडिया (एबीआय) सोबत सहयोगाने हे कर्ज देण्यात आले आहेत आणि टाटा मोटर्स एसबीआयने आकारलेल्या व्याजदरावर सूट देईल – मुलांसाठी ५० टक्के कमी व्याजदर आणि मुली, ट्रान्सजेण्डर व्यक्ती व विशेष विकलांग मुलांसाठी ७० टक्के कमी व्याजदर. या कर्ज सुविधेसाठी पात्र ठरण्याकरिता विद्यार्थ्यांनी किमान २ वर्षांच्या कालावधीसाठी पूर्ण-वेळ पदवी किंवा पदव्युत्तर कोर्समध्ये नोंदणी केली पाहिजे आणि भारतातील किंवा परदेशातील मान्यताकृत युनिव्हर्सिटीज किंवा एआयसीटीई-समकक्ष संस्थांमध्ये प्रवेश घेतला पाहिजे.
उत्कर्ष स्कॉलरशिप: सक्षमीकरणासह सर्वसमावेशकतेला चालना ‘उत्कर्ष’ उपक्रम इयत्ता दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर मुली, ट्रान्सजेण्डर व्यक्ती आणि विशेष विकलांग मुलांच्या उच्च शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी दरवर्षाला २५,००० रूपयांची स्कॉलरशिप देईल. यासाठी पात्र ठरण्याकरिता अर्जदारांनी किमान ६० टक्के गुण मिळवणे आणि भारतातील किंवा परदेशातील मान्यताकृत युनिव्हर्सिटी किंवा एआयसीटीई-समकक्ष संस्थेमध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे


