नोएडा, 30 जुलै, 2024 – सीआयआय ने रॅडिसन, नोएडा येथे सीआयआय एमएसएमई ग्रोथ समिट आयोजित केले. या कार्यक्रमाने उद्योगातील नेतुत्व , उद्योजक आणि तज्ञांना एमएसएमई क्षेत्राच्या वाढीसाठी संधी आणि आव्हाने या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र आणले.सीआयआय वेस्टर्न युपी एमएसएमई आणि स्टार्ट-अप पॅनेलचे अध्यक्ष आणि सूद हेल्थकेअर प्रा . ली चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. साहिल धारिया, यांनी एमएसएमई क्षेत्राचे भारतीय अर्थव्यवस्थेत असलेले महत्व सांगून कार्यक्रमाची सुरवात झाली . भारताच्या आर्थिक वाढीचा आणि नवोन्मेषाचा कणा म्हणून एमएसएमई उद्योगाची स्थिती अधोरेखित करत श्री धारिया यांनी तथ्ये सादर केली.


