Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन*

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन*

*

पुणे, दि. ४ : सहायक आयुक्त समाज कल्याण विभागाच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती तथा ‘बालिकादिन’चे औचित्य साधून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी शासकीय अभियोक्ता तथा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा समितीच्या अध्यक्षा ॲड. शारदा वाडेकर यांनी ‘कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणास प्रतिबंध’ या विषयावर व्याख्यान दिले.

कार्यक्रमास समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे, विशेष अधिकारी मल्लिनाथ हरसुरे, प्रादेशिक उपायुक्त कार्यालयातील सहायक लेखाधिकारी नंदकुमार कुलकर्णी, जिल्हा दक्षता समितीचे अशासकीय सदस्य संतोष शेलार, समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शासकीय वसतिगृहांचे गृहप्रमुख, गृहपाल व विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments