Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedफिटनेस आयकॉन मिलिंद सोमण यांची ग्रीव्हज इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या अँपिअर नेक्ससशी भागीदारी ...

फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण यांची ग्रीव्हज इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या अँपिअर नेक्ससशी भागीदारी · सिंहगड ते पन्हाळा किल्ल्यापर्यंत युनिटी रनला केली सुरूवात

पुणे,12 ऑगस्ट 2024 : फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण यांनी ग्रीव्हज इलेक्ट्रिक मोबिलिटी (जीईएम) सोबतच्या भागीदारीमध्ये युनिटी रनचा एक भाग म्हणून सिंहगड किल्ला ते पन्हाळा किल्ला असा विशेष प्रवास सुरू केला आहे. या वर्षीची रन ही विशेष आयाम गाठणारी असणार आहे,कारण नुकतेच जीईएम तर्फे सादर करण्यात आलेल्या उच्च-कार्यक्षमता फॅमिली इलेक्ट्रिक स्कुटर अँपिअर नेक्सस सोबत मिलिंद सोमण या रनमध्ये प्रवास करणार आहे.

 

एस एव्ही अँपिअर,शिवाजीनगर,पुणे येथून 10 ऑगस्ट रोजी या युनिटी रनचा फ्लॅग ऑफ करण्यात आला. यावेळी डीलर्स आणि ग्राहकांच्या भेटीनंतर मिलिंद सोमण यांनी अँपिअर नेक्सस इलेक्ट्रिक स्कुटरवरून आपल्या मोहिमेला सुरूवात केली. या रनसाठी शहरांतर्गत लांब पल्ल्यांचा प्रवास असल्याने पुढील चार दिवसांत नेक्सस मिलिंद सोमणचा साथीदार असणार आहे. 13 ऑगस्ट रोजी वसई-विरार किल्ल्यावर या रनचा समारोप होणार आहे.या दरम्यान सोमण यांनी मुंबईतून प्रवास करताना ग्रीव्हज समुदायाशी संवाद साधला.

 

 

 

एप्रिलमध्ये सादर करण्यात आलेल्या अँपिअर नेक्ससला आपली शक्तीशाली कामगिरी,मजबूत बांधणी आणि स्टायलिश डिझाईनसाठी द नेक्स बिग थिंग असे संबोधले गेले आहे,जे इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटला पुन्हा परिभाषित करण्याची कटिबध्दता दर्शविते. शहरी भागातील ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी संपूर्णपणे भारतात संकल्पित आणि विकसित केलेली ही स्कुटर 30 टक्के अतिरिक्त बॅटरी आयुष्यासह यामध्ये 3 केडब्ल्यूएच एलएफपी बॅटरीचा समावेश आहे. नेक्ससला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून ती सुरूवातीच्या ऑफरसह बुकिंगसाठी उपलब्ध आहे.

 

 

 

2021 मध्ये सुरू करण्यात आलेला युनिटी रन हा मिलिंद सोमण यांचा एक उल्लेखनीय फिटनेस उपक्रम असून यामध्ये आरोग्य, ऐक्य आणि पर्यावरण विषयक जागरूकता यावर भर दिला जातो. या सहकार्याचा उद्देश्य पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. ग्रीव्हज इलेक्ट्रिक मोबिलिटी सोबतच्या भागीदारीचे उद्दिष्ट हे शाश्वत पर्याय आणि समाज म्हणून आपल्या आरोग्य व कल्याणावर होणारा एकंदरीत परिणाम अधोरेखित करणे हा असून जेणे करून असंख्य लोकांना शाश्वत गतिशीलता स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करता ये

ईल.

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments