Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedफायर बॉल स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलने सुवर्णपदकावर नाव कोरले

फायर बॉल स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलने सुवर्णपदकावर नाव कोरले

 

 

पुणे, १२ ऑगस्टः रोमांचकारी व अटीतटीच्या खेळामध्ये चपळतेचा वापर करून ध्रुव ग्लोबल स्कूलच्या ११ वर्षाखालील मुलींच्या संघाने फायरबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ११-१० या स्कोअरच्या जोरावर विरूध्द टीमला १ पॉइंट ने हरवून सुवर्णपदकावर नाव कोरले. त्यांच्या या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशोवर्धन मालपाणी व प्राचार्या संगीता राऊतजी यांनी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्यात.

महाराष्ट्र मंडळ बास्केटबॉल क्लबतर्फे गुलटेकडी येथे आयोजित फायर बॉल स्पर्धेत २० पेक्षा अधिक संघांनी सहभाग नोंदिविला होता. यामध्ये फायनल राउंडमध्ये ध्रुव ग्लोबल स्कूल च्या खेळाडूंनी रोमांचकारी आणि बुद्धीमत्तेचा वापर करून सुवर्णपदक ध्रुव ग्लोबल स्कूलच्या नावे केले. या टीम मध्ये सायली जैन, जुई गोडबोले, ईशा नरगुंडे आणि अनया जैन यांचा समावेश होता. त्यांच्या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी बास्केटबॉल प्रशिक्षक मिस पूनम बुट्टे व संकेत कुंभार यांनी मार्गदर्शन केले.

तसेच प्राचार्या संगीता राऊतजी म्हणाल्या, या विजयामुळे शाळेसाठी अभिमानास्पद घटना आहे. यामुळे आमच्या विद्याथिर्र्ंनींमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

 

००००००००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments