Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedशहर राष्ट्रवादी काँग्रेस बचतगट महासंघ सेलची जम्बो कार्यकारिणी जाहीर  ...

शहर राष्ट्रवादी काँग्रेस बचतगट महासंघ सेलची जम्बो कार्यकारिणी जाहीर  युवा नेते पार्थ पवार यांच्या उपस्थितीत शहराध्यक्षा ज्योती गोफणे यांनी दिले नियुक्तीपत्र

 

प्रतिनिधी, १२ ऑगस्ट २०२४ – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पिंपरी चिंचवड शहर बचत गट महासंघ सेलची सुमारे ७० जणांची जम्बो कार्यकारिणी शहराध्यक्षा ज्योती गोफणे यांनी जाहीर केली. पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा ‘नियुक्तीपत्र प्रदान सोहळा’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी आमदार आण्णा बनसोडे, ज्येष्ठ नेते माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मंगला कदम, माजी शहराध्यक्षा वैशाली काळभोर, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, पिंपरी चिंचवड निरीक्षक शीतल हगवणे युवती अध्यक्ष वर्षा जगताप, युवक अध्यक्ष शेखर काटे, माजी नगरसेविका माया बारणे, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, सामाजिक न्याय सेलच्या अध्यक्षा गंगा धेंडे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, शहर कार्याध्यक्ष फजल शेख, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, संजय औसरमल, भोसरी संघटक प्रकाश सोमवंशी यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शहराध्यक्षा गोफणे यांनी बचतगट महासंघ सेलच्या शहर मुख्यसंघटिका पदी पुष्पा शेळके, पिंपरी कार्याध्यक्षपदी आशा शिंदे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष पदी आशा मराठे, भोसरी कार्याध्यक्ष पदी मेधा पळशीकर, चिंचवड कार्याध्यक्ष पदी वंदना कांबळे, उपाध्यक्ष पदी वर्षा शेडगे, मंदा भोंडवे, पुष्पा झिरपे, रंजना रणदिवे, प्रभाग अध्यक्ष पदी कुसुम कांबळे, प्रज्ञा गायकवाड, सरचिटणीस पदी अलका नेमाने यांच्यासह सुमारे ७० महिला पदाधिकाऱ्यांना युवा नेते पार्थ पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना गोफणे म्हणाल्या की, आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पक्षाची ही मोठी जबाबदारी माझ्यावर सोपविली त्याबद्दल मी त्यांची सर्वप्रथम आभारी आहे. दादांच्या विचार आणि कार्याशी प्रभावित होऊन मागील दहा वर्षांपासून कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता मी पक्षाचे प्रामाणिकपणे काम करीत आहे. व माझ्या या कार्याची पक्षश्रेष्ठींकडूनही सातत्याने दखल घेतली जाते. याचा मला आनंद असून आगामी काळात या जम्बो कार्यकारिणीला सोबत घेऊन पक्षवाढीसाठी जोमाने काम करणार असल्याची ग्वाही, गोफणे यांनी यावेळी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments