Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedबॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ प्राथमिक शाळेत डासांमुळे पसरणाऱ्या रोगांपासून बचाव करण्याबाबत जनजागृती मोहिमेचा...

बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ प्राथमिक शाळेत डासांमुळे पसरणाऱ्या रोगांपासून बचाव करण्याबाबत जनजागृती मोहिमेचा प्रारंभ.

पुणे – १३ ऑगस्ट, २०२४: सुरक्षिततेचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाच्या सणाच्या अनुशंघाने ओडोमोस डासांपासून संरक्षण ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. जशी बहीण आपल्या मनगटावर राखी बांधून आपल्या भावाच्या सुरक्षेची काळजी करते, त्याचप्रमाणे ओडोमोस डासांपासून संरक्षण प्रदान करते. या मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांना बँडचे वाटप करून त्यांना डासांपासून पसरणारे आजार आणि त्यापासून बचाव करण्याबाबत जागरूक केले. डासांपासून होणा-या रोगांविरुद्ध शहराच्या लढ्यात योगदान देत, ओडोमोस, डाबरच्या भारतातील प्रसिद्ध पर्सनल ऐप्लीकेशन मॉस्क्युटो रेपेलेन्ट ब्रँडने सुरक्षा बंधन मोहीम सुरू करण्याची घोषणा केली.

 

 

 

मोहिमेचा एक भाग म्हणून, डाबरने मुलांमध्ये ओडोमोस डासांपासून बचाव करणारी उत्पादनेही वितरित केली. कंपनीने डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया यांसारख्या डासांपासून पसरणाऱ्या आजारांची कारणे, लक्षणे आणि प्रतिबंध याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी चर्चासत्राचेही आयोजन केले होते. या उपक्रमावर बोलताना, डाबर इंडिया लिमिटेडचे मॉस्किटो रिपेलेंट, कॅटेगरी हेड श्री संतोष जयस्वाल म्हणाले, “सुरक्षा बंधन मोहीम समाजाच्या आरोग्याला चालना देण्यासाठी डाबर ओडोमोसच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने डासांपासून बचाव करण्याबाबत जनजागृती करून या मोहिमेचा समाजावर सकारात्मक प्रभाव निर्माण झाला.

 

 

 

पुणे येथील बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ प्राथमिक शाळेत या उपक्रमाचा शुभारंभ करताना, डाबरने शहरातील शाळकरी मुले, शिक्षक आणि पालकांसाठी एक जनजागृती सत्र आयोजित केले होते, जिथे त्यांना डेंग्यू पसरवणाऱ्या डासांपासून बचाव करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. ह्यावेळी डाबर इंडियन चे दिनेश कुमार, देशसेवा फौंडेशन चे नरेंद्र पारखे, उपप्रशासकीय अधिकारी शुभांगी चव्हाण, पर्यवेक्षक सौ. आशादेवी धुमाळ समग्र शिक्षा अभियानाच्या दळवी मॅडम नितीन वाणी प्रभारी मुख्याध्यापक, शिक्षिका सुनिता जाधव, संजीवनी सोनार, आशा उंडे, प्रदिप गवळी, स्वाती लोहकरे, सुरेखा खैरे, पुजा घोगरे, अजय कोंढावळे, तुषार तमनर, रोहित सिरसवाल, शाळा क्रमांक ११८ बी. चे सर्व कर्मचारी आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. प्रभारी मुख्याध्यापक नितीन वाणी सरांनी डाबर इंडिया चे आभार मानताना त्यांचे कौतुक केले आणि मुलांना ह्या उपक्रमाबद्दल माहिती आणि मार्गदर्शन केले.

 

 

—

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments