पुणे,13 ऑगस्ट 2024 : भारतातील पसंतीचे नेबरहुड कॅफे असलेल्या सोशल ला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत.9 शहरांमध्ये 54 ठिकाणी सोशलचा विस्तार झाला आहे.हा महत्त्वाचा टप्पा साजरा करताना 16 ऑगस्ट 2024 पासून ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत सोशल मधील सर्वांत पसंतीच्या खाद्यपदार्थांचे द ओ जी मेन्यू उपलब्ध असेल.कला प्रदर्शनांपासून ते ट्रिब्युट पार्टीजपर्यंत विविध उपक्रम ब्रँड तर्फे आयोजित करण्यात आले आहेत.सोशलची सुरूवात बंगळुरूमधील एमजी रोड येथील चर्च स्ट्रीट येथे 2014 मध्ये झाली.त्यानंतर दिल्ली येथील हाऊज खास आणि मुंबईत कुलाबा येथे सुरूवात झाली.त्यानंतर मुंबई,दिल्ली एनसीआर,बंगळुरू सह पुणे,इंदौर,हैदराबाद,कोलकाता,चंदीगड आणि डेहरादून येथे विस्तार झाला.


