पुणे – स्वातंत्र्यदिनी शनिवार पेठेतील मोतीबागेत ज्येष्ठ आध्यात्मिक विचारवंत डॉ. कल्याणी नामजोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. भारतीय संस्कृती संवर्धक संस्था आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कसबा भागाच्या वतीने गुरूवारी (ता.15) स्वातंत्र्यदिनानिमित्त सकाळी ७.४५ वाजता ध्वजारोहण होईल. तसेच एकता मासिकाच्या मणिपूर विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी आणि रा.स्व. संघाच्या कसबा भागाचे संघचालक अॅड. प्रशांत यादव यांनी दिली.


