Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedफळे, भाजीपाला व फुले निर्यात परिषदेचे गुरुवारी आयोजन

फळे, भाजीपाला व फुले निर्यात परिषदेचे गुरुवारी आयोजन

 

 

पुणे, दि. २०: महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने फळे, भाजीपाला व फुले निर्यात परिषदेचे येत्या गुरुवार २० ऑगस्ट रोजी यशदा येथे आयोजन करण्यात आले आहे.

 

पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार असून यावेळी सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनूप कुमार, अपेडाचे प्रादेशिक प्रमुख प्रशांत वाघमारे, परकीय व्यापार महासंचालनालयाचे उपमहासंचालक दिलीराज दाभोळे, फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे क्षेत्रीय प्रमुख ऋषिकांत तिवारी, आरपीक्यूएस मुंबईचे सहसंचालक डॉ. ब्रिजेश मिश्रा आदी उपस्थित राहणार आहेत.

 

या परिषदेत अपेडा, डीजीएफटी, एनपीपीओ, जेएनपीटी, कॉनकोर, फेडरेशन ऑफ इंडियन एस्पोर्ट ऑर्गनायझेशन तसेच राज्यातील विविध फळे, भाजीपाला व फुलाचे यशस्वी निर्यातदार यांचे मार्गदर्शनदेखील आयोजित करण्यात येणार आहे. पॅकेजिंग, वाहतूक आणि लॉजिस्टिक सुधारण्यासाठी धोरणे याबाबतदेखील चर्चा होणार आहे.

 

या परिषदेतून शासनाच्या कृषीमाल विषयक विविध विभागांच्या योजना, त्यांचे निकष, जागतिक बाजारातील ट्रेंड, गुणवत्ता मानके आणि निर्यातविषयक नियमांची माहिती उपस्थितांना होणार आहे. निर्यातदार व निर्यात बाजारातील इतर प्रमुख घटकांचादेखील यावेळी एकमेकांशी संवाद होणार असल्यामुळे ही परिषद राज्यातून फळे, भाजीपाला व फुलांच्या निर्यातीवृद्धीकरिता उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम आणि मॅग्नेटचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे यांनी दिली.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments