Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedवाजवा रे'चं नवंकोरं गाणं 'मनाचं पुस्तक' प्रेक्षकांच्या भेटीला...* ...

वाजवा रे’चं नवंकोरं गाणं ‘मनाचं पुस्तक’ प्रेक्षकांच्या भेटीला…* *गाण्याचा संगीत अनावरण सोहळा संपन्न.*     

 

 

दिनांक १ सप्टेंबर रोजी पुणे येथे अक्षय वाघमारे आणि मीरा जोशी यांची मुख्य भूमिका असलेलं सतीश पाटील निर्मित आणि समीर वंजारी दिग्दर्शित मराठी गाणं ‘मनाचं पुस्तक’ हे गाणं वाजवा रे या YouTube चॅनेल वर प्रदर्शित झालं आहे.

 

या गाण्याचा संगीत अनावरण सोहळा नुकताच पुणे येथे पार पडला या निमित्ताने गाण्याची संपूर्ण टीम उपस्थित होती, या गाण्याचे संगीत हरीश पाटील (जय हरी) यांनी केले असून राज बाबर याचा आवाज लाभला आहे तसेच निहार राजहंस याने लिहिले आहे.

 

या गाण्यामध्ये वयात आलेल्या एका युवकाची कथा दाखवण्यात आली आहे जो आपल्या आईने सांगितलेल्या मुलीला बघायला जात आहे आणि त्याच्या मनात असणाऱ्या मुलीला कसा भेटतो हे पाहणे रंजक ठरणार आहे. गाणे श्रवणीय असून या गाण्यामध्ये निसर्गरम्य वातावरण देखील पाहायला मिळत आहे. या गाण्याचे चित्रीकरण खानापूर परिसरात झाले आहे.

 

सतीश पाटील आणि समीर वंजारी यांनी या कार्यक्रमानिमित्ताने सांगितले कि “वाजवा रे ची संकल्पना हि नवनवीन कलाकारांना आपल्या हक्कच व्यासपीठ मिळावं यासाठी आम्ही एकत्र येऊन याची सुरुवात केली आहे आणि आम्ही काही नवीन कलाकृतीसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहोत तसेच सर्वानी या कार्यांत सहकार्य करावे आणि गाण्याला भरभरून प्रेम द्यावे अशी विनंती केली.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments