गुरूग्राम, भारत – ऑगस्ट ३०, २०२४: सॅमसंग या भारतातील आघाडीच्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज भारतात आपली नवीन बीस्पोक एआय डबल डोअर रेफ्रिजरेटर सिरीज लाँच केली. बीस्पोक डिझाइन आणि प्रगत एआय वैशिष्ट्ये जसे स्मार्टथिंग्ज एआय एनर्जी मोड, स्मार्टथिंग्ज होम केअर, स्मार्ट फॉरवर्ड, तसेच कन्वर्टिबल ५-इन-१, ट्विन कूलिंग प्लस™ व अॅक्टिव्ह फ्रेश फिल्टर+ असलेल्या नवीन लाइन-अपचा भारतातील ग्राहकांच्या बदलत्या गरजांची पूर्तता करण्याचा मनसुबा आहे.
सॅमसंग बीस्पोक एआय डबल डोअर रेफ्रिजरेटर सिरीज ग्लास व स्टील फिनिशसह निवडता येतील असे अनेक पर्याय, जसे ब्लॅक ग्लास, ब्लॅक मॅट, ल्यूक्स ब्लॅक, एलीगण्ट आयनॉक्स आणि रिफाइन्ड आयनॉक्समध्ये उपलब्ध असेल. सॅमसंगची नवीन बीस्पोक एआय डबल डोअर रेफ्रिजरेटर सिरीज ३६९ लीटर, ४१९ लीटर व ४६५ लीटर या तीन क्षमतांमध्ये उपलब्ध असण्यासोबत ६४,९९० रूपयांच्या सुरूवातीच्या किमतीमध्ये उपलब्ध असेल, ज्यामधून मोठी स्टोरेज क्षमता, सोयीसुविधा व स्थिरतेची खात्री मिळेल.
”रेफ्रिजरेटर श्रेणीमधील प्रमुख म्हणून आमचा कूलिंगपलीकडे फोकस आहे. आमचे अप्लायन्सेस उपलब्धता, अनुकूलता आणि आकर्षक डिझाइन देत दैनंदिन राहणीमान उंचावतात. बीस्पोक एआय डबल डोअर रेफ्रिजरेटर घरातील सजावटीमध्ये परिपूर्णपणे सामावून जातात. या सिरीजमध्ये प्रगत एआय वैशिष्ट्ये, बीस्पोक डिझाइन व मोठी स्टोरेज क्षमता आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना कार्यक्षमता, ऊर्जा क्षमता व डिझाइनचे परिपूर्ण एकत्रिकरण मिळते,” असे सॅमसंग इंडियाच्या डिजिटल अप्लायन्सेस बिझनेसचे वरिष्ठ संचालक सौरभ बैशाखिया म्हणाले.
स्मार्टथिंग्ज एआय एनर्जी मोड
एआय एनर्जी मोड रेफ्रिजरेटरच्या वापरण्याच्या पद्धतीचे विश्लेषण करत ऊर्जा वापर ऑप्टिमाइज करते, ज्यामुळे वीज वापरामध्ये जवळपास १० टक्के घट होते. हे इंटेलिजण्ट वैशिष्ट्य ऊर्जा कार्यक्षमता वाढवते, ज्यामुळे हे रेफ्रिजरेटर्स पर्यावरणदृष्ट्या जागरूक कुटुंबांसाठी योग्य निवड आहेत. एआय एनर्जी मोड होम अप्लायन्सच्या वीज वापराचे कार्यक्षम व्यवस्थापन करते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात बचत होते. हे वैशिष्ट्य ऊर्जा वापरावर देखरेख व नियंत्रण ठेवते, ज्यामुळे अप्लायन्सेससह रेफ्रिजरेटर सर्वोच्च कार्यक्षमतेसह कार्यान्वित असण्याची खात्री मिळते.
स्मार्टथिंग्ज होम केअर
होम केअर रेफ्रिजेरेटरवर देखरेख ठेवेल आणि त्यानंतर तुम्हाला संभाव्य समस्यांबाबत सूचित करेल, तसेच मेन्टेनन्स समस्या असल्यास तुम्हाला अलर्ट करेल. होम केअरमध्ये उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्यास मदत करण्यासाठी समस्या-निवारण सूचना, युजर गाइड्स आणि व्हिज्युअल साह्य देखील देते.
स्मार्ट फॉरवर्ड
स्मार्ट फॉरवर्ड ही सर्विस आहे, जी नियमितपणे ओव्हर-द-नेटवर्क सॉफ्टवेअर अपडेट्स देते, जे पूर्व-मालकीच्या रेफ्रिजरेटरला आधुनिक फंक्शन्ससह अपडेटेड व संबंधित राहण्यास सक्षम करतात.
स्मार्ट लायटिंग (जेण्टल लायटिंग)
डिमिंग मोड हळूहळू लाइट चालू करते. जेण्टल लायटिंग स्मार्टथिंग्ज अॅपच्या माध्यमातून ब्राइटनेस अॅडजस्टमेंटची सुविधा देते. नाइट लाइट मोड दिवसातील वेळेप्रमाणे आपोआपपणे ब्राइटनेस समायोजित करते, ज्यामुळे वापरकर्त्यांच्या सोयीसुविधेमध्ये वाढ होते.
कन्वर्टिबल ५-इन-१
कन्वर्टिबल ५-इन-१ वैशिष्ट्य भारतातील आधुनिक कुटुंबांच्या सर्व स्टोरेज गरजांनुसार पाच कन्वर्जन मोड्ससह अतिरिक्त स्थिरता देते. ते किराणा माल आणि शिल्लक राहिलेले अन्न ठेवण्यासाठी व्यापक जागा देते, ज्यामधून सुव्यवस्थित स्टोरेजची खात्री मिळते.
ट्विन कूलिंग प्लस™
या वैशिष्ट्यासह तुम्हाला जवळपास दोन पट अधिक फ्रेशनेस मिळतो. बीस्पोक एआय डबल डोअर रेफ्रिजरेटर सिरीजमध्ये दोन एव्हेपोरेटर्स व फॅन्स आहेत, जे स्वतंत्रपणे कूलिंग करणाऱ्या फ्रिज व फ्रिजर सेक्शनचे व्यवस्थापन करतात. यामधून जवळपास ७० टक्क्यांपर्यंत ओलावा राहण्याची खात्री मिळते, वेगवेगळ्या पदार्थांचे गंध एकत्रित होण्याला प्रतिबंध होते आणि दीर्घकाळापर्यंत सानुकूल फ्रेशनेस राखण्यास मदत होते.
अॅक्टिव्ह फ्रेश फिल्टर+
अॅक्टिव्ह फ्रेश फिल्टर+ फ्रिजच्या आतील हवा शुद्ध, आरोग्यदायी ठेवते आणि जवळपास ९९.९९ टक्के जीवाणूंना दूर करत अन्न दूषित होण्याचा धोका कमी करते. तसेच, हे वैशिष्ट्य गंधांना न्यूट्रिलाइज देखील करते आणि कार्यान्वित कार्बन फिल्टरच्या माध्यमातून हवेला निर्जंतुक व दुर्गंधमुक्त करते.
पॉवर कूल आणि पॉवर फ्रीज
पॉवर कूल आणि पॉवर फ्रीज वैशिष्ट्य त्वरित कूलिंग व फ्रिजिंग सक्षम करते, अल्पावधीत पेयांना थंड करते किंवा फूडला फ्रिजिंग करते. हे वैशिष्ट्य त्वरित कूलिंग किंवा बर्फ बनवण्यासाठी अनुकूल आहे.
डिजिटल इन्व्हर्टर कॉम्प्रेसर
डिजिटल इन्व्हर्टर कॉम्प्रेसर सतत कूलिंग, कमी ऊर्जा अपव्यय आणि किमान बिघाडाची खात्री देतो. २० वर्षांच्या वॉरंटीसह ते विश्वसनीय, दीर्घकालीन कार्यक्षमतेची खात्री देते.
नवीन बीस्पोक एआय डबल डोअर रेफ्रिजरेटर सिरीज ६४,९९० रूपयांच्या सुरूवातीच्या किमतीमध्ये Samsung.com, रिटेल स्टोअर्स आणि
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असेल.


