मुंबई, सप्टेंबर २, २०२४: टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनीने आज एसयूव्ही कूपे ‘टाटा कर्व्ह’च्या लाँचची घोषणा केली, जिची प्रारंभिक किंमत 9.99 लाख रूपये आहे. कंपनीसाठी मोठा टप्पा गाठत आणि नाविन्यपूर्ण व वैविध्यपूर्ण बॉडी स्टाइल्समधील आयसीई पर्यायांसह झपाट्याने विकसित होत असलेल्या मिड-एसयूव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश करत टाटा मोटर्सने तीन इंजिन पर्यायांमध्ये कर्व्ह लाँच केली आहे. या तिन्ही इंजिन पर्यायांच्या व्हेरिएण्ट्समध्ये अॅडवान्स्ड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. शक्तिशाली नवीन हायपेरियन गॅसोलाइन डायरेक्ट इंजेक्शन इंजिन, १.२ लीटर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन आणि नवीन १.५ लीटर क्रियोजेट डिझेल इंजिनसह डिझेलमधील सेगमेंट फर्स्ट ड्युअल क्लच ट्रान्समिशन अशा सर्वोत्तम वैशिष्ट्यांच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना त्यांच्या अद्वितीय गरजांनुसार निवडण्यासाठी उत्तम पर्याय देत आहे.
बॉक्सी-एसयूव्ही बॉडी स्टाइल्ससह लोकप्रिय उच्च विकसित विभागामध्ये टाटा मोटर्सने आपल्या डीएनएशी बांधील राहत, तसेच महत्त्वाकांक्षीपणासाठी जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात मान्यताकृत असलेली बॉडी स्टाइल प्रीमियम एसयूव्ही कूपे डिझाइनचे लोकशाहीकरण करत श्रेणीमध्ये धुमाकूळ निर्माण केला आहे. कर्व्ह ही दर्जात्मक सुरक्षितता, सेगमेंट फर्स्ट वैशिष्ट्ये, अनेक व अद्वितीय पॉवरट्रेन पर्याय असलेली सेगमेंटमधील अद्वितीय वेईकल आहे. गोल्ड एसेन्स, डेटोना ग्रे, प्रिस्टिन व्हाइट, फ्लेम रेड, प्युअर ग्रे आणि ऑपेरा ब्ल्यू या सहा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध टाटा कर्व्ह अकॉम्प्लीश, क्रिएटिव्ह, प्युअर व स्मार्ट परसोनांमध्ये ऑफर करण्यात येईल.
टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स लि. आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. चे व्यवस्थापकीय संचालक श्री. शैलेश चंद्रा म्हणाले, ”टाटा कर्व्हचे लाँच ऑटोमोटिव्ह सर्वोत्तमतेच्या दिशेने मोठे पाऊल आहे, ज्यामुळे भारतात नवीन एसयूव्ही कूपे बॉडी स्टाइल सादर झाली आहे, जी आतापर्यंत फक्त जागतिक स्तरावर मान्यताकृत राहिली आहे आणि फक्त प्रीमियम श्रेणींमध्ये उपलब्ध आहे. सेगमेंटला नव्या उंचीवर घेऊन जाणारी उत्पादने सादर करण्याच्या आमच्या डीएनएशी बांधील राहत कर्व्ह सध्या मिड-एसयूव्ही सेगमेंटमधील सर्वात अद्वितीय ऑफरिंग आहे आणि डिझाइन व तंत्रज्ञानामधील नाविन्यतेप्रती आमच्या कटिबद्धतेला यशस्वीपणे सादर करते. नुकतेच लाँच करण्यात आलेल्या Curvv.ev ला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे आणि तिची डिझाइन व स्टाइल, तसेच उच्चस्तरीय वैशिष्ट्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. याव्यतिरिक्त, उद्योगामध्ये पहिल्यांदाच ईव्ही व आयसीई किमतींमधील समानतेने ग्राहकांच्या भावनांवर सकारात्मक परिणाम देखील केला आहे. लाँच करण्यात आलेली कर्व विविध पॉवरट्रेन्स, विविध फर्स्ट इन सेगमेंट वैशिष्ट्ये, नवीन क्षमतापूर्ण आर्किटेक्चर – अॅटलास आणि लेव्हल २ एडीएएससह सर्वसमावेशक मिड-एसयूव्ही उत्पादन म्हणून आमचा एसयूव्ही पोर्टफोलिओ अधिक दृढ करते. या पॅकेजला अधिक उत्साहित करण्यासाठी आम्ही सर्व व्हेरिएण्ट्समध्ये कर्व्हची किंमत अत्यंत आकर्षक व किफायतशीर ठेवली आहे, ज्यामुळे ही वेईकल ग्राहकांच्या सर्व गरजांची पूर्तता करते. आम्हाला आज बाजारपेठेत ही कार लाँच करण्याचा आनंद होत आहे आणि विश्वास आहे की ग्राहक या वैविध्यपूर्ण ऑफरिंगचा आनंद घेतील.”
टाटा कर्व्ह बाबत
टाटा कर्व्ह फक्त वेईकल नसून आधुनिक ड्रायव्हरच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या यश, स्टाइल व लक्झरीचे प्रतीक देखील आहे. ‘शेप्ड टू स्टन’, ‘शेप्ड फॉर ग्रॅण्ड्यूर, ‘शेप्ड फॉर परफॉर्मन्स’, ‘शेप्ड फॉर इनाव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी’ आणि ‘शेप्ड फॉर अॅब्सोल्यूट सेफ्टी’ या ५ प्रमुख आधारस्तंभांवर डिझाइन करण्यात आलेली कर्व्ह ऑफर करणाऱ्या उत्पादनांच्या सर्वसमावेशक श्रेणीसह भारतातील सर्वात शक्तिशाली एसयूव्ही कंपनी म्हणून टाटा मोटर्सचे स्थान अधिक दृढ करण्यास सज्ज आहे. नाविन्यपूर्ण परसोना धोरणाचे पालन करत प्रत्येक परसोना विविध ग्राहकांच्या अद्वितीय पसंती व जीवनशैली लक्षात घेत विचारपूर्वक क्यूरेट करण्यात आले आहे. हे परसोना प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या वैयक्तिक स्टाइल आणि ड्रायव्हिंग इच्छांशी संलग्न कर्व्ह निवडण्याची सुविधा देतात.
प्रमुख आधारस्तंभ आणि वैशिष्ट्ये:
· शेप्ड टू स्टन: कर्व्हची स्पोर्टी कूपे डिझाइन एसयूव्हीच्या प्रबळ स्टान्सशी विनासायासपणे मिसळून जाते. सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत कनेक्टेड टेल-लॅम्प्स, १८ इंच अलॉई व्हील्स, वॉईस असिस्टेड पॅनोरॅमिक सनरूफसह मूड लायटिंग, फर्स्ट इन सेगमेंट फ्लश डोअर हँडल्स आणि सिग्नेचर वेलकम व गुडबाय फंक्शन.
· शेप्ड फॉर सेफ्टी: टाटा मोटर्सच्याप्रख्यात सेफ्टी डीएनएसह सुसज्ज कर्व्हमध्ये एडीएएस लेव्हल २ सह २० कार्यक्षमता, तसेच क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, ट्रॅफिक साइन रेकग्निशनसह सर्वसमावेशक ईएसपी आणि ३६०-डिग्री सराऊंड व्ह्यू सिस्टम. या एसयूव्हीमध्ये सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकसह ऑटोहोल्ड आहे.
· शेप्ड फॉर ग्रॅण्ड्यूर: कर्व्हच्या इंटीरिअरमधून लक्झरी दिसून येते, ज्यामध्ये फर्स्ट इन सेगमेंट पॉवर्ड टेलगेटसह गेस्चर कंट्रोल, ५०० लीटरचे दर्जात्मक बूट स्पेस (सामानाची जागा), हवेशीर फ्रण्ट सीट्स, ६-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट आणि ६०:४० स्प्लिट रिअर सीटसह रिक्लाइन आहे.
· शेप्ड फॉर इनाव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी: कर्व्हमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे, जसे हार्मन™ची फर्स्ट इन सेगमेंट ३१.२४ सेमी (१२.३ इंच) टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टम, २६.०३ सेमी (१०.२५ इंच) डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, वायरलेस स्मार्टफोन चार्जिंग आणि आयआरए कनेक्टेड कार तंत्रज्ञान.
· शेप्ड फॉर परफॉर्मन्स: कर्व्ह नवीन हायपेरियन गॅसोलाइन डायरेक्ट इंजेक्शन इंजिन, १.५ लीटर क्रियोजेट डिझेल इंजिन आणि १.२ लीटर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन अशा विविध पॉवरेट्रेन पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये मल्टी-ड्राइव्ह मोड्स, पॅडल शिफ्टर्स, स्मार्ट ई-शिफ्टर आणि ७-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे.
अॅटलास आर्किटेक्चर बाबत
नवीन, क्रांतिकारी अॅडप्टिव्ह, टेक-फॉरवर्ड, लाइफस्टाइल आर्किटेक्चर ‘अॅटलास’वर डिझाइन करण्यात आलेली टाटा कर्व्हच्या ऑटोमोटिव्ह डिझाइन आणि रचनेमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. प्रबळ व सुरक्षित रयनेसाठी ओळखले जाणारे हे प्रगत फ्रेमवर्क वेईकलच्या शक्तिशाली एसयूव्ही क्षमतांमध्ये वाढ करते, ज्यामधून उच्च दर्जाची ड्राइव्ह गतीशीलता आणि हाताळणीची खात्री मिळते. सुरक्षितता, स्केलेबिलिटी आणि कार्यक्षमता या तत्त्वांची प्रतीक असलेल्या अॅटलास कर्व्हमध्ये विविध पॉवरट्रेन पर्याय, एैसपैस इंटीरिअर जागा आणि सर्वसमावेशक सुरक्षितता वैशिष्ट्यांची भर करते, ज्यामुळे विश्वसनीयता व नाविन्यतेचा शोध घेत असलेल्या ड्रायव्हर्ससाठी ही वेईकल वैविध्यपूर्ण आणि सर्वांगीण पर्याय आहे. टाटा मोटर्स सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देत असल्यामुळे हे प्लॅटफॉर्म कारला लेव्हल २ एडीएएस वैशिष्ट्यांसह सुसज्ज करते. या तंत्रज्ञानांना पूरक असे उच्च ग्राऊंड क्लीअरन्स व उच्च दर्जाचा दृष्टिकोन, डिपार्चर व रॅम्प-ओव्हर अँगल्स आहेत, ज्यामुळे अॅटलास आव्हानात्मक वातावरणांमध्ये सुलभपणे हाताळणी करते.
टाटा कर्व्हच्या विविध पॉवरट्रेन ऑफरिंग्ज बाबत
अॅटलास प्लॅटफार्म अग्रणी पॉवरट्रेन पर्याय देते, ज्यामुळे कर्व्हच्या प्रत्येक व्हर्जनला विशिष्ट ड्रायव्हिंग गतीशीलता मिळते.
हायपेरियन गॅसोलाइन डायरेक्ट इंजेक्शन इंजिन: मिड-एसयूव्ही सेगमेंटमध्ये शक्ती, क्षमता व इंधन कार्यक्षमतेच्या एकत्रिकरणाची मागणी आहे. या मागणीची पूर्तता करण्यासाठी टाटा मोटर्सने हायपेरियन गॅसोलाइन डायरेक्ट इंजेक्शन इंजिन सादर केले आहे, जे एसयूव्ही कूपेप्रमाणे उच्चस्तरीय कार्यक्षमता देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. हे योग्य आकाराचे इंजिन आहे, ज्यामध्ये मीन पंच समाविष्ट आहे, ज्यामुळे ड्रायव्हर्स स्पोर्टी व उत्साहित ड्राइव्हचा आनंद घेऊ शकतात. या सर्व कारणांमुळे कर्व्ह कारप्रेमींसाठी उत्साहवर्धक पर्याय आहे. हायपेरियन इंजिन हायपरफॉर्मन्स व हायपरक्वाइट या तत्त्वांवर निर्माण करण्यात आले असून हायपरटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून वितरित करण्यात आले आहे.
• हायपरफॉर्मन्स: गॅसोलाइन डायरेक्ट इंजेक्शन आणि दर्जात्मक टॉर्क घनता व उच्च दर्जाच्या लो एण्ड टॉर्कसह टर्बोचार्जिंग व्यापक ऑपरेटिंग बँडमध्ये अधिक शक्ती देत हे संपादित केले जाते.
• हायपरटेक्नॉलॉजी: हायपेरियन इंजिनमध्ये वापरण्यात आलेल्या अॅडवान्स्ड टेक्नॉलॉजीमध्ये ३५० बार फ्यूएल इंजेक्शन सिस्टम, व्हेरिएबल जिओमेट्री टर्बोचार्जर, सोडियम कूल्ड एक्झॉस्ट व्हॉल्व्ह्ज, मिलर सायकल कम्बशन चेम्बर, हायड्रॉलिक कॅम फेजिंगसह सेंट्रल ऑईल कंट्रोल व्हॉल्व्ह, एक्झॉस्ट आफ्टर ट्रीटमेंटसह गॅसोलाइन पार्टिक्युलेट फिल्टर आहे, जे इंजिनची कार्यक्षमता व प्रतिसादत्मकता वाढवते.
• हायपरक्वाइट: इंजिनचे एकूण एनव्हीएच बारकाईने कमी करण्यात आले आहे, ज्यामधून उत्साहवर्धक व शांतमय प्रवासाची खात्री मिळते.
१.२ लीटर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन: १.२ लीटर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन प्रमाणित टर्बोचार्ज्ड पॉवरट्रेन देते, जे शहरातील रस्त्यांमधून प्रवास करायचा असो किंवा महामार्गावर क्रूझ करायचे असो सर्वोत्तम कार्यक्षमतेची खात्री देते. या इंजिनला पूरक विविध ड्राइव्ह मोड्स आहेत – इको, सिटी आणि स्पोर्ट, जे विविध ड्रायव्हिंग स्थितींशी जुळून जातात. या वेईकलमध्ये पॅडल शिफ्टर्स आणि डीसीएसाठी स्मार्ट ई-शिफ्टर आहे. ७-स्पीड डीसीए वैशिष्ट्यांमध्ये वेट क्लचसह अॅक्टिव्ह कूलिंग तंत्रज्ञान, ऑटो पार्क लॉक, मशिन लर्निंग क्षमता, शिफ्ट-बाय-वायर तंत्रज्ञान आणि सेल्फ-हिलिंग मेकॅनिझम आहे. ही सर्व वैशिष्ट्ये ड्रायव्हिंग कार्यक्षमता आणि आरामदायीपणामध्ये वाढ करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.
१.५ लीटर क्रियोजेट डिझेल इंजिन: कर्व्हला शक्ती देणारे १.५ लीटर क्रियोजेट डिझेल इंजिन टाटा मोटर्सचे नवीन डिझेल इंजिन आहे. या इंजिनमध्ये श्रेणीमधील दर्जात्मक शक्ती, टॉर्क व इंधन कार्यक्षमता आहे, जी अद्वितीय सोयीसुविधा देते. तसेच हे पॅसिव्ह एससीआर तंत्रज्ञान असलेले त्याच्या श्रेणीमधील एकमेव डिझेल इंजिन देखील आहे, ज्यामुळे अॅडब्ल्यू रिफिल्सची गरज न भासता उत्सर्जन कमी होते आणि दर्जात्मक मेंटेनन्सची खात्री मिळते. ई-शिफ्टर असलेल्या फर्स्ट इन सेगमेंट ७-स्पीड डीसीएमध्ये विविध ड्राइव्ह मोड्स – इको, सिटी व स्पोर्ट, वेट क्लचसह अॅक्टिव्ह कुलिंग तंत्रज्ञान, शिफ्ट-बाय-वायर तंत्रज्ञान, सेल्फ-लर्निंग क्षमता, पेटंटेड सेल्फ-हीलिंग तंत्रज्ञान आणि ऑटो पार्क लॉक वैशिष्ट्य आहे.
हा प्लॅटफॉर्म ग्राहकांच्या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे आणि कार्यक्षमता, सुरक्षितता व तंत्रज्ञान नाविन्यतेचे परिपूर्ण संयोजन देत ऑटोमोटिव्ह एक्सलन्सच्या भविष्याला आकार देत आहे.
*कर्व्हच्या प्रारंभिक किंमती केवळ ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत केलेल्या बुकिंग्जवरच लागू असतील.


