Wednesday, September 23, 2026
Google search engine
HomeUncategorized३६व्या पुणे फेस्टिव्हलचे १३ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते...

३६व्या पुणे फेस्टिव्हलचे १३ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन !

१४ सप्टेंबर रोजी श्रीगणेश कला क्रीडा रंगमंच येथे रात्री ८.०० वाजता सादर होईल. भारताचे माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद आलम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ,अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष खा. इम्रान प्रतापगढी हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यामध्ये अनिस शौक (शेगाव), अहमद कमाल हाश्मी (कोलकाता), रफीक सरवर (मालेगाव), मारूफ रायबरेल्वी (निजामत), काशिफ सय्यद (भिवंडी), विशाल बाग (पुणे), शाहिद आदिली (हैदराबाद),शाहिस्ता सना , हाशमी फिरोझाबादी (फिरोझाबाद) हे देशातील नामवंत शायर सहभागी होत आहेत. शायरांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुफ रायबरेलवी हे करणार असून, संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उज्मा तसनीम करणार आहेत. या कार्यक्रमाचे संयोजन डॉ. पी ए इनामदार विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. ए. इनामदार हे असून ,डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आबेदा इनामदार या निमंत्रक आहेत.

 

हास्यकल्लोळ धम्माल महाराष्ट्राच्या विनोदवीरांची : संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी हास्याचे धबधबे निर्माण करणारा ‘हास्यकल्लोळ धम्माल महाराष्ट्राच्या विनोदवीरांची’ हा कार्यक्रम रविवार दि. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न होईल. यामध्ये प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर, रसिका वेंगुर्लेकर, रोहित माने आणि प्रथमेश शिवलकर हे कलाकार सहभागी होत आहेत. सोबत ऑर्केस्ट्रा म्युझिक बँड, २ गायक, ४ वादक व १ निवेदक असेल. हा कार्यक्रम अडीच तासांचा असेल.

 

 

 

मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा : महिलांच्या व्यक्तिमत्त्व आणि गुण यांची ही स्पर्धा असून, यंदा या नामांकित स्पर्धेचे हे १०वे वर्ष आहे. सोमवार, दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता श्रीगणेश कला क्रीडा रंगमंच येथे ही स्पर्धा पार पडेल. प्रख्यात गायिका व बँकर सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते विजेत्यांना मुगुट परिधान केले जातील. या स्पर्धेत १८ ते २८ वर्षे वयोगटातील १५० हून अधिक युवतींनी सहभाग घेतला. प्राथमिक फेरीनंतर यातील २० तरुणींची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. सिनेमॅटोग्राफर अमेय अवधानी, मॉडेल-अभिनेत्री साक्षी पाटील आणि शो डायरेक्टर व ग्रूमिंग मेंटॉर जुई सुहास यांनी अंतिम फेरीसाठी निवड केली असून, या सर्व २० स्पर्धक तरुणींना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये त्यांची दंतचिकित्सा, केस व त्वचा चिकित्सा, नृत्य प्रशिक्षण, फोटोशूट यांचाही समावेश आहे. या स्पर्धेवेळी अभिनेत्री सानिया चौधरी, स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉंलॉजीच्या प्रिसिपल गरिमा भल्ला, फॅशन कोरिओग्राफर आणि मेंटॉर चैतन्य गोखले, अभिनेता ध्रुव दातार, फॅशन फोटोग्राफर अश्विन कोडगूल हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. सुप्रिया ताम्हाणे हा कार्यक्रम सादर करतील. जुई सुहास या शो डायरेक्टर व ग्रूमिंग मेंटॉर आहेत.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments