ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते समाजगुरुंचा सत्कार*

तारां कित Avatar

 

पुणे, दि. ३ – महाराष्ट्राच्या उच्च शिक्षणमंत्र्यांनी जीवनाच्या विविध क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेल्या समाजगुरुंचा गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिनाच्या निमित्ताने सन्मान करावा या संकल्पनेतून ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते काही समाजगुरुंचा सत्कार करण्यात येणार आहे. येत्या शुक्रवारी ६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजता बालशिक्षण मंदिर सभागृहात होणाऱ्या विशेष समारंभात हा सन्मान करण्यात येणार असल्याचे पुनर्निर्माण सोशल फाऊंडेशन आणि विद्या प्रबोधिनी या आयोजक संस्थांच्या वतीने सांगण्यात आले.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, आयसर कोलकाताचे अध्यक्ष डॉ. अरविंद नातू, ‌‘इस्त्रो’ मधील निवृत्त संशोधक सुरेश नाईक, निवृत्त न्यायमूर्ती आणि विधी विभागाचे माजी मुख्य सचिव व्ही. के. देशपांडे, माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडलचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवयित्री आसावरी काकडे आणि साहित्यिक ल. म. कडू, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, प्रसिद्ध लेखक आणि वनस्पतीतज्ज्ञ प्रा. प्र. के. घाणेकर, ‌‘आपलं घर’चे संचालक विजय फळणीकर, ज्येष्ठ अस्थिशल्य विशारद डॉ. संजीव गोखले यांचा प्रातिनिधीक सत्कार चंद्रकांतदादांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. २६ जुलै रोजी पुण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे स्थगित झालेला हा कार्यक्रम आता ६ सप्टेंबर रोजी संपन्न होत आहे.

🙏

Tagged in :

तारां कित Avatar