Tuesday, September 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedपारलिंगी व्यक्तींकरीता कार्यशाळा संपन्न*

पारलिंगी व्यक्तींकरीता कार्यशाळा संपन्न*

पुणे, दि १३: समाज कल्याण विभाग व सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँण्ड अॅक्टिव्हिटी यांच्या संयुक्त विद्यमाने पारलिंगी समुदायाच्या जीवनात येणाऱ्या अडचणी तसेच त्यांना लैंगिकतेशी निगडीत मुद्यावर जागरुकता कार्यक्रमाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

सामाजिक न्याय विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच विविध महामंडळे, बीव्हीजी आणि क्रिस्टल कंपनीतील कर्मचारी तसेच शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये या विषयी जागृती व्हावी याकरीता ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेस प्रितेश कांबळे, मिलन लबडे व समीर शेख यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, समाज कल्याण निरीक्षक गोपीचंद आल्हाट, पोलीस हवालदार धनश्री कामठे, स्वाती पोमन व सामाजिक न्याय विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments