Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथे इंटरनॅशनल प्रिन्सिपल्स कॉन्क्लेव्ह संपन्न

सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथे इंटरनॅशनल प्रिन्सिपल्स कॉन्क्लेव्ह संपन्न

पुणे,27 सप्टेंबर 2024 : सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एसएसपीयु) येथे इंटरनॅशनल प्रिन्सिपल्स कॉन्क्लेव्हच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन किवळे कॅम्पस येथे करण्यात आले. या उपक्रमाचे उद्दिष्ट विविध शाळा आणि कॉलेजेसमधील सर्वोत्कृष्ट पध्दती व यशस्वी उपक्रम जाणून घेणे तसेच विचारांची देवाण घेवाण आणि समन्वय साधणे हा होता. या उपक्रमात भारत,नेपाळ,श्रीलंका आणि आखाती देशातील सुमारे 20 प्राचार्यांनी सहभाग घेतला.

 

याप्रसंगी एसएसपीयुच्या प्र-कुलपती डॉ.स्वाती मुजूमदार,कुलगुरू डॉ.राजेश इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत करताना एसएसपीयुच्या प्र-कुलपती डॉ.स्वाती मुजूमदार म्हणाल्या की, देशाचा विकास होण्यासाठी समाजाचा विकास होणे गरजेचे आहे आणि सामाजिक,आर्थिक विकासासाठी शिक्षण हा एक महत्त्वाचा घटक आहे. याच उद्देशाने शिक्षक असलेल्या डॉ.एस.बी.मुजूमदार यांनी 1971 मध्ये सिंबायोसिसची स्थापना केली.

 

त्या पुढे म्हणाल्या की,महाराष्ट्रातील पहिले कौशल्य आधारित विद्यापीठ म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आमच्या उपक्रमांना मान्यता मिळत आहे. यातूनच कौशल्य आधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होते. रोजगार क्षमता आणि रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करून सामाजिक – आर्थिक विकास साधण्यासाठी कौशल्य आधारित दृष्टीकोनाचे महत्त्व आता जगभरातील लोकांना समजले आहे. या कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून सर्व प्राचार्यांना एकाच व्यासपीठावर आणून सर्वोत्कृष्ट पध्दती जाणून घेणे, एकमेकांकडून शिकणे आणि युवकांच्या विकासासाठी एकत्रितपणे योग्य मार्गाचा अवलंब करणे हे आमचे ध्येय आहे.

 

या कॉन्क्लेव्हमध्ये इंडस्ट्री फर्स्ट ॲप्रोच,बिल्डिंग अ बेटर टुमारो यासारख्या सत्रांबरोबरच सहभागी संस्थांनी आपले अनुभव व सर्वोत्कृष्ट पध्दतींचे सादरीकरण केले.उच्च सामर्थ्य असलेले क्षेत्र व करिअर्स वर उपस्थितांनी आपले मत मांडले.

 

डॉ.राजेश इंगळे यांनी द वे फॉरवर्ड या विषयावर समारोपीय भा

षण केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments