संपूर्ण भारतातील लोक सणासुदीच्या काळाचा आनंद घेत असताना इंडिया यामाहा मोटरला महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी विशेष ऑफर्सची घोषणा करण्याचा आनंद होत आहे. उत्सवी आनंदामध्ये अधिक उत्साहाची भर करत यामाहाच्या विशेष डिल्स लोकप्रिय १५० सीसी एफझेड मॉडेल श्रेणी आणि १२५ सीसी एफआय हायब्रिड स्कूटर्सवर मोठे फायदे देतात, ज्यामुळे ग्राहकांसाठी त्यांची स्वप्नवत यामाहा दुचाकी खरेदी करण्यासाठी ही परिपूर्ण वेळ आहे.
ऑफर्स आणि योजना:
· एफझेड-एस एफआय व्हर्जन ४.०, एफझेड-एस एफआय व्हर्जन ३.०, एफझेड एफआयवर जवळपास ७,००० रूपयांची कॅशबॅक आणि ७,९९९ रूपयांचा लो-डाऊन पेमेंट.
· फॅशिनो १२५ एफआय हायब्रिड व रेझेडआर १२५ एफआय हायब्रिडवर जवळपास ४,००० रूपयांची कॅशबॅक आणि २,९९९ रूपयांचा लो-डाऊन पेमेंट.
यामाहाच्या वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओमध्ये प्रीमियम वेईकल्सचा समावेश आहे, जसे वायझेडएफ-आर३ (३२१ सीसी), एमटी-०३ (३२१ सीसी), वायझेडएफ-आर१५एम (१५५ सीसी), वायझेडएफ-आर१५ व्ही४ (१५५ सीसी), वायझेडएफ-आर१५एस व्ही३ (१५५ सीसी), एमटी-१५ व्ही२ (१५५ सीसी) आणि एफझेड सिरीज बाइक्स जसे एफझेड-एस एफआय व्हर्जन ४.० (१४९ सीसी), एफझेड-एस एफआय व्हर्जन ३.० (१४९ सीसी), एफझेड एफआय (१४९ सीसी) व एफझेड-एक्स (१४९ सीसी). याव्यतिरिक्त, यामाहा स्कूटर्सची श्रेणी देखील देते, जसे ऐरॉक्स १५५ व्हर्जन एस (१५५ सीसी), ऐरॉक्स १५५ (१५५ सीसी), फॅशिनो एस १२५ एफआय हायब्रिड (१२५ सीसी), फॅशिनो १२५ एफआय हायब्रिड (१२५ सीसी), रेझेडआर १२५ एफआय हायब्रिड (१२५ सीसी) आणि रेझेडआर स्ट्रिट रॅली १२५ एफआय हायब्रिड (१२५ सीसी).


