Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक वालावलकर मैदान...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक वालावलकर मैदान येथे संपन्न*

 

 

ठाणे, दि.30 (जिमाका) : ठाणे शहरात कासारवडवली येथील वालावलकर मैदान येथे होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, दि.5 ऑक्टोबर 2024 रोजी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान यांच्या या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी पूर्वतयारीची बैठक आज सोमवार, दि.30 सप्टेंबर रोजी वालावलकर मैदान, बोरीवडे या प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी संपन्न झाली.

हवामान खात्याने वर्तविलेल्या पावसाची शक्यता लक्षात घेवून मुख्य सभामंडप, पार्किंग व्यवस्था येथील सर्व नियोजन करण्यात यावे. त्याचबरोबर वीज पुरवठा, इंटरनेट सेवा, आरोग्य सेवा यांची पर्यायी व्यवस्थाही उपलब्ध करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी दिल्या. तसेच, या काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार असल्याने ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीसाठी बंद होणारे रस्ते, सेवा रस्त्यांच्या वापराची स्थिती आदींबाबत नागरिकांना अवगत करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले.

सुमारे 40 हजार नागरिकांची उपस्थिती या कार्यक्रमास अपेक्षित असून ठाणे तसेच ग्रामीण व महापालिकांमधून सुमारे 1200 बसगाड्यांची ये-जा घोडबंदर रोड परिसरात होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा नियोजित दौरा शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे. या दौऱ्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्थांचे नियोजन करण्यासाठी विविध जबाबदाऱ्यांची निश्चिती करण्यात आली आहे. त्यानुसार, पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी ठाणे वालावलकर मैदान येथे बैठक झाली. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सर्जेराव म्हस्के-पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, उप विभागीय अधिकारी उर्मिला पाटिल, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागूल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, एमएमआरडीए, महामेट्रो अशा विविध महत्त्वाच्या विभाग/कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

मुख्य सभामंडप, हेलिपॅड, गाड्या आणि बसेस पार्किंग व्यवस्था, वीज पुरवठा, सीसीटीव्ही नेटवर्क, जोड रस्ते यांच्या सद्य:स्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

बसगाड्यांची पार्किंग व्यवस्था, अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचे प्रवास मार्ग आदींबाबत या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी संदिप माने यांनी सादरीकरण केले. सुमारे 1200 गाड्यांच्या पार्किंगचे नियोजन महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. त्या जागा ताब्यात घेण्यात आल्या असून त्यांचे सपाटीकरण आदी कामाबाबत चर्चा करण्यात आली. तर, मुख्य सभामंडप आणि हेलिपॅड यांच्या व्यवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांनी माहिती दिली. या बैठकीनंतर उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळ व हेलिपॅड ठिकाणी एकत्रित पाहणी केली.

000000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments