Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे स्थित फ्लिटगार्ड फिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड (FFPL) 'आयकोनिक ब्रँड्स ऑफ इंडिया 2024'...

पुणे स्थित फ्लिटगार्ड फिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड (FFPL) ‘आयकोनिक ब्रँड्स ऑफ इंडिया 2024’ पुरस्काराने सन्मानित

पुणे, २७ सप्टेंबर २०२४ – पुण्यातील ‘फ्लिटगार्ड फिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या फिल्टरेशन उत्पादने आणि ऑन आणि ऑफ हायवे ऍप्लिकेशन्सची पूर्तता करणाऱ्या कंपनीला “आयकोनिक ब्रँड्स ऑफ इंडिया 2024” हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला. ET Now आयकोनिक ब्रँड्स ऑफ इंडिया पुरस्कारांच्या 7व्या आवृत्तीचे २६ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबईत आयोजन करण्यात आले होते.

 

हा पुरस्कार श्री. निरंजन किर्लोस्कर, व्यवस्थापकीय संचालक, फ्लिटगार्ड फिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड; श्री. पियुष श्रीवास्तव, मार्केटिंग आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सचे प्रमुख, आणि श्रीमती गौरी पानसरे, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सच्या कार्यकारी यांनी स्वीकारला. या कार्यक्रमात नवकल्पना, शाश्वतता आणि जागतिक प्रभावाद्वारे राष्ट्रीय विकासाला चालना देणाऱ्या ब्रँड्सचा सन्मान करण्यात आला.

 

यावेळी बोलताना, श्री. निरंजन किर्लोस्कर म्हणाले, “आयकोनिक ब्रँड्स ऑफ इंडिया म्हणून आम्हाला ओळखले जाणे हा आमच्यासाठी खरोखरच अभिमानास्पद क्षण आहे. हा पुरस्कार आमच्या टीमच्या समर्पणाचे आणि ऑटोमोटिव्ह उद्योगाला नवीन, शाश्वत सोल्यूशन्स प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. आम्ही प्रगती साधण्या बरोबरच आमच्या ग्राहकांसाठी गुणवत्ता आणि सेवेमध्ये नवीन मानके स्थापित करण्यासाठी कटिबद्ध आहोत. ग्राहकांना सर्वाधिक मूल्य प्रदान करणे हा आमच्या स्थापनेपासूनच आमचा केंद्रबिंदू राहीला आहे. जो कायमच आम्हाला उत्कृष्टता साधण्यासाठी प्रेरित करतो. हा पुरस्कार आमच्या टीमच्या निरंतर प्रयत्नांचे आणि उद्योगातील आमच्या स्वतःच्या मानकांना पार करण्याच्या सततच्या प्रयत्नाचे प्रमाण आहे.”

 

या सन्मानामुळे फ्लिटगार्डच्या वाढत्या पुरस्कारांच्या यादीत आणखी एक मानाचा तूरा खोवला गेला आहे. या पुरस्कारामुळे ऑटोमोटिव्ह उद्योगात कंपनी आता आघाडीवर असून कंपनी नविन्यता आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी सोल्यूशन्स प्रदान करण्यास कटिबद्ध आहे.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments