एलजी, सॅमसंग आणि सोनीसारख्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड्सवर तसेच रिलायन्स, क्रोमासारख्या रिटेल दालनांमध्ये ४०,००० रुपयांपर्यंतची सवलत
· मॅकबुक एयर, एचपी, डेल आणि एसरसारख्या ब्रँडवर १०,००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक
· ग्राहकांना आयफोन १६ च्या खरेदीवर ५००० रुपयांचा तत्काळ कॅशबॅक मिळणार
· मिंत्रा बिग फॅशन फेस्टिवलवर खास ऑफर्स
मुंबई – आयसीआयसीआय बँकेचा वार्षिक फेस्टिव्ह बोनान्झाचे परत आयोजन करण्यात आले असून त्यात इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल्स, फॅशन, दागिने, प्रवास, ई- कॉमर्स आणि डायनिंगवर आकर्षक डील्स दिली जाणार आहेत. बँकेच्या ग्राहकांना या ऑफर्सचा लाभ घेता येईल, शिवाय त्यांचे क्रेडिट/डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, कार्डलेस ईएमआय व ग्राहक वित्त सुविधा वापरून ४०,००० रुपयांपर्यंतची सवलत मिळवता येईल. ग्राहकांना त्यांचे क्रेडिट/डेबिट कार्ड वापरून नो कॉस्ट ईएमआयचाही लाभ घेता येणार आहे.
बँकेद्वारे आयफोन १६ आणि अपलच्या इतर उत्पादनांवर खास डील्सही दिली जाणार आहेत. आयफोन १६ च्या खरेदीवर ग्राहकांना त्यांच्या क्रेडिट कार्डवर ५००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक आणि क्रेडिट व डेबिट कार्डद्वारे केलेल्या ईएमआय खरेदीवर मिळणार आहे. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डधारकांना अपलच्या आयफोन फॉर लाइफ या प्रोग्रॅमसाठी नोंदणी करण्याचा पर्यायही मिळणार आहे. यामुळे त्यांना निवडक आयफोन मॉडेल्सवर २४९७ रुपयांपासून सुरू होणारे व्याजमुक्त हप्ते २४ महिने भरता येतील तसेच त्यांना सध्याच्या आयफोनवर खात्रीशीर बायबॅक पर्याय मिळेल व अद्ययावत आयफोन घेता येईल. बिग फॅशन फेस्टिव्हलमध्ये ग्राहकांना खास ऑफर्सचा लाभ घेता येईल. त्याशिवाय त्यांना बँकेचे गृह कर्ज, कार कर्ज, दुचाकी कर्ज आणि शैक्षणिक कर्ज यावरही खास ऑफर्स मिळतील.
या लाँचविषयी आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक श्री. राजेश झा म्हणाले, ‘ग्राहकांसाठी परत ‘फेस्टिव्ह बोनान्झा’ आणताना आम्हाला आनंद होत असून त्यात विविध सवलती, ऑफर्स व कॅशबॅक्सचा समावेश आहे. विविध क्षेत्रांतील आघाडीच्या ब्रँड्सची भागिदारी करत आम्ही आकर्षक ऑफस व सवलती या सणासुदीच्या काळासाठी तयार केल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना खरेदीचा आणखी आनंद घेता येईल. या डील्सचा आयसीआयसीआय बँकेचे डेबिट/क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, ग्राहक वित्त आणि कार्डलेस ईएमआयद्वारे लाभ घेता येणार आहे. या ऑफर्समुळे ग्राहकांसाठी सणांचा हा काळ आणखी आनंददायी होईल.’
फेस्टिव्ह बोनान्झाच्या प्रमुख ऑफर्स पुढीलप्रमाणे –
· मोबाइल फोन्स: आयफोन १६ वर ५००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक. वन प्लस, गुगल पिक्सेल, झियोमी, रियलमी, ऑप्पो मोबाइल फोन्सवर आकर्षक सवलती आणि ईएमआय ऑफर्स.
· इलेक्ट्रॉनिक्स: एलजी, सॅमसंग, सोनी, हायर, आयएफबी, युरेका फोर्ब्ज यांसारख्या विविध इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड्सवर ४०,००० रुपयांपर्यंतची सवलत. बोसच्या स्पीकर्सवर ५००० रुपयांपर्यंतची सलत आणि जेबीएलच्या उत्पादनांवर ८००० रुपये किंवा १५ टक्क्यांपर्यंतची सवलत. ग्राहकांना क्रोमा आणि रिलायन्स डिजिटलमध्येही आकर्षक सवलतींचा लाभ घेता येईल.
· ऑनलाइन खरेदी: मिंत्रा आणि टाटा क्लिकवर ऑनलाइन खरेदीवर १० टक्क्यांपर्यंतची सवलत.
· लॅपटॉप: मॅकबुक एयर, एचपी, डेल आणि एसरवर १०,००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक
· फॅशन: शॉपर्स स्टॉप, मिंत्रा, एजिओ आणि अशा आघाडीच्या फॅशन ब्रँड्सवर १० टक्के सवलत
· प्रवास: मेकमायट्रिप, थॉमस कुक, यात्रा, ईझमायट्रिप अशा विविध प्रवासी ब्रँड्सवर आकर्षक सवलती.
· किराणा: ब्लिंकिट, स्विगी इन्स्टामार्ट, जिओ मार्टवर सवलती
· खादयपदार्थ ऑर्डरिंग आणि डायनिंग – झोमॅटो, स्विगी आणि ईझीडायनरवर सवलती
· फर्निचर आणि गृह सजावट : स्टॅन्ले, ड्युरोफ्लेक्स आणि द स्लीप कंपनी अशा ब्रँड्सवर १० टक्के सवलत
*ऑफर्सवर अटी व शर्ती लागू


