Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedसारथ्य फाऊंडेशन तर्फे ऑलिंपिक खेळाडूंचा सत्कार

सारथ्य फाऊंडेशन तर्फे ऑलिंपिक खेळाडूंचा सत्कार

मदत निधीसाठी सारथ्य फाऊंडेशनच्या वतीने ‘रंग उषेचे’ हा कार्यक्रम येत्या १० ऑक्टोबर २०२४ रोजी

 

पुणे, 2 ऑक्टोबर 2024: निधी संकलनाच्या उपक्रमांचा एक भाग म्हणून ‘सारथ्य फाऊंडेशन’च्या वतीने ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या गाण्यांचा आणि मुलाखतीचा समावेश असलेला ‘रंग उषेचे’ हा कार्यक्रम येत्या १० ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ९-३० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी निवडक ऑलिम्पिकपटू, पॅरालिंपिकपटू, तसेच अर्जुन व छत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे.

 

याविषयी अधिक माहिती देताना सारथ्य फाऊंडेशनचे

प्रसन्न कुलकर्णी यांनी सांगितले की, ‘सारथ्य फाऊंडेशन’ ही संस्था क्रीडाक्षेत्रातील गुणवान खेळाडूंना अधिक यशस्वी आणि सक्षम होण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करते. योग्य वेळी योग्य मदत, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि संसाधनांसह आधुनिक सुविधा मिळाल्या, तर महत्त्वाकांक्षी खेळाडू संधीचे सोने करून भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च स्तरावर झळकावितील, असा आम्हाला विश्वास वाटतो. तसा अनुभवही आमच्या पाठीशी आहे.

 

तसेच, या कार्यक्रमात भारतीय नेमबाजी संघाच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे, अंजली भागवत आणि पॅरालिंपिक सुवर्णविजेते मुरलीकांत पेटकर यांचा सत्कार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. काही खेळाडूंचा सत्कार यांचा होणार आहे.

 

जास्तीत जास्त खेळाडूंनी अशा प्रकारे यश मिळवावे आणि हे यशस्वप्न प्रत्यक्षात यावे, याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत. ‘सारथ्य फाऊंडेशन’ ही संस्था खेळाडूंना केवळ क्रीडांगणावरच नव्हे, तर वैयक्तिक जीवनातही प्रगती करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करते. क्रीडाक्षेत्रातील नैपुण्यावर लक्ष केंद्रित करताना, सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी खेळाडूंना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांना निधी उपलब्ध करून देतो आणि निधी संकलनासाठी विविध उपक्रमही राबवतो.

 

त्याच प्रमाणे ‘सारथ्य फाऊंडेशन’च्या वेबसाइटचे लाँचिंग याच कार्यक्रमात होणार आहे.सर्व दानशूर नागरिकांनी, हितचिंतकांनी व क्रीडाप्रेमींनी या कार्यक्रमाला हजर राहावे आणि फाऊंडेशनच्या कार्याला सढळ हस्ते साहाय्य करावे, असे आवाहन

करीत आहोत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments