Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedअखेर त्यांच्याही अस्थींचे विधिवत विसर्जन राष्ट्रीय कला अकादमी (न्यास) तर्फे संगम...

अखेर त्यांच्याही अस्थींचे विधिवत विसर्जन राष्ट्रीय कला अकादमी (न्यास) तर्फे संगम घाटावर बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन आणि विसर्जन

पुणे : मृत व्यक्ती कोण आहे हे न बघता, जाती-धर्माच्या पलीकडे जात सद््भावनेतून अस्थींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. त्यामुळे बेवारस मृतांच्या अस्थींची प्रतीक्षा संपली आणि त्या बेवारस मृतांच्या आत्म्याला शांती लाभली. सर्वपित्री अमावस्या निमित्त राष्ट्रीय कला अकादमी (न्यास) तर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संगम घाटावर बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन आणि विसर्जन करण्यात आले.

 

यावेळी अकादमीचे अध्यक्ष मंदार रांजेकर, सदाशिव कुंदेन, संचालक योगेश गोलांडे, रोमा लांडे, अमर लांडे, अकादमीचे सभासद किरण फाळके ,मनोज गवळी, राजेश निकम, गणेश ओरसे, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, डॉ.मिलिंद भोई, बाला शुक्ला, संजय मयेकर, शाहीर हेमंत मावळे, दगडूशेठ दत्त मंदिराचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, राजेंद्र काकडे, नितीन पंडित, पियुष शहा, प्रकाश पोटावत्री, सागर पवार,गोपीशेठ बोज्जा,सागर घम, आशिष जराड, सुषमा खटावकर, मनीषा निंबाळकर, रोहिणी चेंन्नूर, वर्षा तांबोळी, ऍड.चित्रा जानुगडे,वैशाली पाटील,सहाय्यक आयुक्त अशोक झुळूक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक तुळशीराम साबळे, आरोग्य निरीक्षक जनार्दन जाधव, मुकादम नागेश बाराथे, नागेश लांडगे, सेवा दाहिनी वरील सर्व कर्मचारी, मनपा कर्मचारी, सुहास मदनाल,अरुण अमृतवाड, किरण सावंत, राजेश शिंदे, चेतन शर्मा, आय टी शेख, सुरेश सकपाळ, रुपाली निवदेकर, अशोक चिंबळकर, केतन भागवत,संजय आदवडे, मंगेश तडके, किरण सोनीवाल,सुधीर ढमाले, विकास भांबुरे, विजय भोसले, यशवंत बोगम,अक्षय माने, मुकेश खामकर, ऋषिकेश माने, बापू तिकोने, जमन तिकोने,अमोल गुळीग, दत्तात्रय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

मंदार रांजेकर म्हणाले, राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने दरवर्षी सर्वपित्री अमावास्येला बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन व विसर्जन केले जात असून या उपक्रमाचे हे चौदावे वर्ष आहे. पुण्यामध्ये दरवर्षी अनेक बेवारस मृतदेह सापडतात त्यांचे कोणीही नसते. त्यामुळे त्यांचे अंतिम विधी विधिवत होत नाहीत. अशा मृतांच्या अस्थी विधिवत विसर्जित करून त्यांना शांती लाभण्यासाठी सर्वपित्री अमावस्येला उपक्रम राबविला जातो. बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन करून त्यांच्या आत्म्यास शांती व सद्गती लाभावी यासाठी मंत्रोच्चार आणि अध्यायांचे पठण करण्यात येते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments