पुणे, दि. 2 – ‘स्प्रिंगर नेचर’ या सुप्रसिद्ध प्रकाशन संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी ‘इंडिया रिसर्ट टूर’ हा कार्यक्रम करण्यात येतो. या वर्षी नवी दिल्ली येथील ‘इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च’ या संस्थेच्या सहकार्याने हा कार्यक्रम करण्यात येत आहे. या टूरचा या वर्षीचा भर भारतातील पश्चिम आणि दक्षिण भागावर असणार आहे. पुणे येथील भांडारकर संस्थेमध्ये या टूरचा कार्यक्रम *गुरुवार, दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजता* होणार आहे. या कार्यक्रमामध्ये ‘ओपन ॲक्सिसमधून संशोधनाच्या क्षेत्राचे दृढीकरण’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात स्प्रिंगरच्या प्रतिनिधींसोबत भांडारकर संस्थेच्या वतीने प्रा. ग. उ. थिटे आणि प्रा. श्रीकान्त बहुलकर हे सहभागी होणार आहेत. स्प्रिंगरचे कार्यकारी संचालक वेंकटेश सर्वसिद्धी तसेच भांडारकर संस्थेचे सचिव सुधीर वैशंपायन, खजिनदार संजय पवार, विश्वस्त प्रदीप रावत आणि कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमामध्ये असेल. डॉ. विजया देशपांडे, डॉ. सुरुची पांडे, डॉ. मैत्रेयी देशपांडे, डॉ. मुग्धा गाडगीळ आणि डॉ. गौरी मोघे या भांडारकर संस्थेशी संबंधित पाच महिला संशोधिकांचा सत्कारही प्रातिनिधिक स्वरूपात या वेळी करण्यात येईल अशी माहिती भूपाल पटवर्धन यांनी आज येथे दिली.
———–


