भारत, दिल्ली, ऑक्टोबर ३ : ‘झूम व्हिडिओ कम्युनिकेशन्स, इंक.’ने (एनएएसडीएक्यू : झेडएम) आज भारतातील उद्योग क्षेत्रातील आघाडीचा ‘झूम फोन’ लॉन्च केल्याची घोषणा केली. त्यानुसार महाराष्ट्र टेलिकॉम सर्कलमध्ये (पुणे) मूळ भारतीय फोन नंबरसह ही झूम फोन सेवा आता उपलब्ध होणार आहे. झूम फोन बहुराष्ट्रीय संस्थांना (एमएनसीज्) देशांतर्गत उपस्थिती, स्वदेशी कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये अतुलनीय सुलभता आणि आधुनिक कार्यक्षमता आणण्यास मदत करते. तसेच ५० देश आणि केंद्रशासित प्रदेशांशी जागतिक व्याप्तीही मिळवून देते.
झूम फोनची मूळ फोन नंबर सेवा महाराष्ट्र दूरसंचार मंडळ (पुणे), त्यानंतर कर्नाटक (बंगळुरू), तामिळनाडू (चेन्नई), आंध्र प्रदेश (हैदराबाद), मुंबई आणि दिल्ली दूरसंचार मंडळासह (टेलिकॉम सर्कल) उपलब्ध असेल, ज्यामध्ये भारतातील सर्व प्रमुख तंत्रज्ञान केंद्रांचा समावेश आहे. ‘झूम इंडिया’ला एप्रिल २०२३ मध्ये भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून (डीओटा) पूर्ण भारतातील एकत्रित परवाना आणि दूर अंतराचे परवानेही मिळाले. त्यानंतर ‘झूम इंडिया’ने भारतात झूम फोनसाठी देशांतर्गत पायाभूत सुविधा स्थापन करण्यावर आणि नियामक आवश्यकतांचे पालन करण्यावर लक्ष केंद्रित केले. भारतासाठी स्थानिक फोन नंबर्ससह प्रथमच परवानाकृत क्लाउड ‘प्रायव्हेट ब्रांच एक्सचेंज’ (पीबीएक्स) सेवा सुरू करण्याचे हे प्रयत्न ‘झूम’ला या क्षेत्राचे नेतृत्व करण्यास सक्षम करते.
‘झूमची क्लाउड पीबीएक्स सेवा भारताच्या एकत्रित दूरसंचार परवान्याच्या आवश्यकता पूर्ण करते. त्यासाठी नियामक आवश्यकतांनुसार समर्पित स्थानिक अंतर्जोडणीतील पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे झूम फोनचे हे पाऊल आमच्या ग्राहकांना हवी असलेली विश्वासार्ह सेवा आणण्यासाठीची वचनबद्धता दर्शवते,’ असे झूमचे उत्पादन आणि अभियांत्रि
की


