पुणे दि. 15 ऑक्टोबर ः एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा ६वां दीक्षांत समारंभ शनिवार दि. १९ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ४.०० वा. विश्व सभामंडप, वर्ल्ड पीस डोम, विश्वराजबाग, लोणीकाळभोर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या वर्षी ५३६९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच विज्ञान क्षेत्रात आयुष्यभर केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार पद्मश्री डॉ. कृष्णस्वामी विजय राघवन यांना “एमआयटी डब्ल्यूपीयू विज्ञान महर्षी सन्मान ” देऊन गौरविण्यात येणार आहे.
या समारंभासाठी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील. तसेच माईर्सचे संस्थापक विश्वस्त प्रा.पी.बी.जोशी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, माईर्सच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु कराड व एमआयटी डब्ल्युपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस उपस्थित राहणार आहेत.
या दीक्षांत समारंभात अभिजीत पवार याला ‘फाउंडर प्रेसिडेंट मेडल’ व अनुश्री कुलकर्णी हिला ‘एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट मेडल’ ने गौरविण्यात येणार आहे. तसेच १२२ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक, ८५ रौप्य व ८५ कास्य पदक असे एकूण २९५ विद्यार्थ्यांना मेडल बहाल करण्यात येणार आहे. तसेच २६ विद्यार्थ्यांना पी.एचडी देण्यात येणार आहे. यामध्ये ४३५ विद्यार्थी मेरीट लिस्ट मधील आहेत.
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, कम्प्यूटर सायन्स अॅण्ड इंजीनियरिंग, रामचरण स्कूल ऑफ लिडरशीप बिझनेस, ईकॉनॉमिक्स अॅण्ड कॉमर्स, स्कूल ऑफ गर्व्हनमेंट, हेल्थ सायन्य अँड टेक्नॉलॉजी, सायन्स अँड एनवोर्मेटन्टल स्टडीज, डिझाइन, लिबरल ऑर्टस,लॉ आणि कॉन्शसनेस या व्यतिरिक्त अन्य शाखोतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत.
अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलसचिव प्रा.गणेश पोकळे आणि परिक्षा नियंत्रक डॉ. राहुल जोशी यांनी दिली.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा ६ वां दीक्षांत समारंभ १९ ऑक्टोबर रोजी ५३६९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार
RELATED ARTICLES


