Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorized२६ विद्यार्थिनींनी पूर्ण केला इंडस्ट्री 4.0 आणि मॅन्युफॅक्चरिंग अभ्यासक्रमातील डिप्लोमा *...

२६ विद्यार्थिनींनी पूर्ण केला इंडस्ट्री 4.0 आणि मॅन्युफॅक्चरिंग अभ्यासक्रमातील डिप्लोमा * सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये राबविण्यात येणाऱ्या स्वाती उपक्रमाच्या माध्यमातून अधिक महिला पारंपरिक उत्पादन व वाहन उद्योग क्षेत्रात करत आहेत प्रवेश

पुणे,१५ ऑक्टोबर २०२४ : सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एसएसपीयू) किवळे कॅम्पस येथे नुकतेच डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन आणि डिप्लोमा इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स हे दोन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या 26 विद्यार्थिनींना डिप्लोमा प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. करण थापर प्रवर्तित डीबीएच इनव्हेस्टमेंटचा भाग असलेल्या प्रिमियम ग्रुप ऑफ कंपनीजच्या सीएसआर उपक्रमाअंतर्गत कौशल्याद्वारे महिला सक्षमीकरणासाठी स्वाती हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथे इंडस्ट्री 4.0 आणि मॅन्युफॅक्चरिंग या विषयात गरजू विद्यार्थिनींना मोफत डिप्लोमा अभ्यासक्रम प्रदान केला जातो.हे प्रमाणपत्र प्रमुख पाहुणे व प्रिमियम ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष करण थापर,एसएसपीयूचे कुलपती डॉ.एस.बी.मुजूमदार,प्र-कुलपती डॉ.स्वाती मुजूमदार व बिझनेस लीडर अनंथा नायक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

प्रिमियम ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष करण थापर म्हणाले की,या डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना रोजगार मिळाला आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे आणि विद्यार्थ्यांना रोजगार कार्यक्षम बनविणे आणि भविष्यासाठी सज्ज करणे हेच या उपक्रमाचा हेतू आहे.एनआयआरएफ रँकिंगमधील स्किल्स युनिव्हर्सिटी कॅटेगरीमध्ये पहिला क्रमांक मिळाल्याबद्दल करण थापर यांनी एसएसपीयूचे अभिनंदन केले.ते म्हणाले की, यातूनच स्वाती हा उपक्रम योग्य हातात आहे हे अधोरेखित होते.

एसएसपीयूचे कुलपती डॉ.एस.बी.मुजूमदार म्हणाले की,ज्ञान आणि कौशल्य एकत्रित करणारी प्रणाली हाच शिक्षणाचा योग्य मार्ग आहे आणि या नाविन्यपूर्ण कल्पनेतूनच सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी अस्तित्वात आली.पदवीबरोबरच कौशल्य प्रदान करण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि उद्योगात सहयोग आवश्यक असतो. शिक्षणातील हे नवीन परिवर्तन सुरू करण्याची ही योग्य वेळ आहे.

एसएसपीयूच्या प्र-कुलपती डॉ.स्वाती मुजूमदार म्हणाल्या की, मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशनमधील या दोन वर्षाच्या डिप्लोमा अभ्यासक्रमात विविध शहरातून आणि गावातून विद्यार्थिनी सहभागी होत आहेत.या विद्यार्थिनींना उद्योगातील सर्वोत्कृष्ट पध्दतींसाठी प्रशिक्षित करणाऱ्या उद्योगांचे संस्थापक आणि त्यांच्या टीमची याबाबत उत्कृष्ट गुणवत्ता आणि वचनबध्दता दर्शविते.या मुलींना विविध रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत.यातूनच या प्रकल्पाचे चांगले परिणाम दिसून येतात.हा प्रकल्प जगासमोर एक आदर्श निर्माण करीत असून इच्छुक विद्यार्थिनींना एक आशेचा किरण निर्माण करत आहे.

बिझनेस लीडर अनंथा नायक यांनी त्यांच्या व्यावसायिक प्रवासाचे कथन करताना सांगितले की,आपला सर्वांचा एक उद्देश्य असला पाहिजे आणि त्या दिशेने सतत प्रयत्न केले पाहिजेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments