मुंबई, १५ ऑक्टोबर २०२४ – एचडीएफसी लाइफच्या संचालक मंडळाने ३० सप्टेंबर २०२४ रोजी समाप्त झालेल्या सहामाहीसाठी स्वतंत्र व एकत्रित आर्थिक निकाल मंजूर करून स्वीकारले आहेत. कंपनीने सर्व महत्त्वपूर्ण बाबींमध्ये मोठी वाढ केली असून सकारात्मक गती राखली आहे.
कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये:
§ उच्च-स्तरीय वाढ: नवीन बिझनेस प्रीमियम (वैयक्तिक एपीई) मध्ये प्रबळ ३१ टक्के वाढीची नोंद केली, ज्याला विक्री करण्यात आलेल्या पॉलिसी आणि संतुलित उत्पादन संयोजनामध्ये २२ टक्के वाढीचे पाठबळ मिळाले.
§ मार्केट शेअर: खाजगी क्षेत्र मार्केट शेअर (वैयक्तिक डब्ल्यूआरपी) ६० बीपीएसने वाढून १६.३ टक्क्यांपर्यंत पोहोचले. एकूण मार्केट शेअर सर्वोच्च ११ टक्क्यांपर्यंत पोहोचला.
§ नवीन व्यवसायाचे मूल्य (व्हीएनबी) १७.४ टक्क्यांनी वाढून १,६५६ कोटी रूपयांपर्यंत पोहोचले, ज्यामधून लाभदायी व्यवसायावरील फोकस दिसून येतो.
§ अॅसेट्स अंडर मॅनेजमेंट (एयूएम): एयूएम ३० सप्टेंबर २०२४ रोजी ३.२५ लाख कोटी रूपये राहिले, ज्यामध्ये आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या सहामाहीत २३ टक्क्यांची वाढ झाली.
§ सातत्यता: १३व्या व ६१व्या महिन्याचे सातत्यता प्रमाण अनुक्रमे ८८ टक्के आणि ६० टक्क्यांपर्यंत सुधारले, ज्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत मटेरिअलमध्ये अनुक्रमे १२० बेसिस पॉइण्ट्स व ७३० बेसिस पॉइण्ट्सची वाढ झाली. यामधून कंपनीची ग्राहकांसोबत संलग्न होण्यासोबत त्यांना कायम ठेवण्याची क्षमता दिसून आली.
§ एम्बेडेड व्हॅल्यू (ईव्ही) ने तिमाहीदरम्यान ५०,००० कोटी रूपयांचा टप्पा पार करण्यासोबत ईव्हीवरील कार्यरत परताव्यामध्ये १६.० टक्क्यांची नोंद केली, यामधून पॉलिसीधारक आणि शेअरधारकांसाठी स्थिर दीर्घकालीन मूल्य निर्मिती दिसून आली.
§ आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या सहामाहीत ९११ कोटी रूपयांचा करोत्तर नफा (पीएटी) संपादित करण्यात आला, ज्यामध्ये वार्षिक १५ टक्के वाढीची नोंद करण्यात आली.
§ सॉल्वन्सी रेशिओ १८१ टक्के राहिला, जो नियामक थ्रेशोल्ड १५० टक्क्यांपेक्षा जास्त होता. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी १,००० कोटी रूपयांच्या अधीनस्थ कर्ज वाढीनंतर सॉल्वन्सी १९२ टक्के राहिले.
§ एचडीएफसी पेंशन फंड मॅनेजमेंट एचडीएफसी लाइफची पूर्णत: मालकीची उपकंपनी आणि भारतातील सर्वात मोठी खाजगी पेंशन फंड मॅनेजर आहे. या कपंनीने आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या सहामाहीत असेट्स अंडर मॅनेजमेंटमध्ये १ लाख कोटी रूपयांचा टप्पा गाठत मोठी उपलब्धी संपादित केली.
§ कर्मचाऱ्यांवर फोकस: आम्हाला आमच्या सर्वसमावेशकता व कर्मचारी-केंद्रित धोरणांसाठी सन्मानित करण्यात आले, जेथे बीएफएसआय क्षेत्रामध्ये बेस्ट कंपनीज फॉर विमेन इन इंडिया आणि अवतार अँड सेरामाऊंट यांच्याद्वारे एक्झेम्प्लर ऑफ इन्क्लुजन (मोस्ट इन्क्लुसिव्ह कंपनीज इंडिया २०२४) या पुरस्कारांसह गौरविण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विधान:
एचडीएफसी लाइफच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विभा पडळकर म्हणाल्या, ”खाजगी क्षेत्र आणि एकूण उद्योगाने दुसऱ्या तिमाहीमधील प्रबळ वाढ कायम ठेवली, तसेच आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या सहामाहीत वैयक्तिक भारित प्राप्त प्रीमियम बेसिसमध्ये अनुक्रमे २४ टक्के आणि २१ टक्के वाढीची नोंद केली. आम्ही याच कालावधीदरम्यान २८ टक्क्यांची आणि २ वर्ष सीएजीआर बेसिसवर १९ टक्क्यांची वाढ करत खाजगी क्षेत्राला मागे टाकले आहे. आम्ही पॉलिसींच्या संख्येमध्ये २२ टक्के वाढीची नोंद केली, जी खाजगी क्षेत्रामधील १३ टक्के वाढीच्या तुलनेत जास्त होती. आम्हाला प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणीच्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये स्थिर वाढ दिसण्यात आली.
नियामकसंदर्भात, आम्ही १ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या सुधारित नियमनांचे पालन करत ४० हून अधिक टॉप उत्पादने यशस्वीरित्या रिलाँच केली आहेत, ज्यांनी व्यवसायामध्ये जवळपास ९५ टक्क्यांचे योगदान दिले आहे. तसेच आम्ही तिमाहीदरम्यान इतर उत्पादने देखील रिलाँच करणार आहोत. नवीन उत्पादन नियमनांशी संलग्न होण्याकरिता तीन महिन्यांचा अतिरिक्त कालावधी देण्यासाठी आम्ही नियामकांचे आभार व्यक्त करतो.
तसेच, आम्हाला सांगताना आनंद होत आहे की एचडीएफसी लाइफला शाश्वतता व जबाबदार शासनाप्रती कटिबद्धतेसाठी सन्मानित केले जात आहे. एचडीएफसी लाइफच्या एसअँडपी ग्लोबल ईएसजी स्कोअरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आणि आम्ही प्रादेशिक विमा कंपन्यांपैकी एक म्हणून प्रमाणित आहोत. आमचे एमएससीआय ईएसजी रेटिंग देखील ‘ए’ श्रेणीपर्यंत अपग्रेड करण्यात आले आहे.
आम्ही शाश्वत विकासाला चालना देण्यावर आणि प्रमुख विभागांमधील आमचे नेतृत्व अधिक प्रबळ करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्यासोबत गतीशील बाजारपेठेत स्थिर राहण्याची खात्री घेण्यासाठी ग्राहक-केंद्रित इनोव्हेशन्समध्ये गुंतवणूक करत राहू. आम्हाला भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य देण्याप्रती आमच्या क्षमतेवर विश्वास आहे, तसेच आम्ही गतीशीलता व स्थिरतेसह बदलत्या बाजारपेठेत स्थितीशी जुळवून घेत राहू.”
प्रमुख आर्थिक सारांश
कोटी रूपये
आर्थिक वर्ष २५ ची पहिली सहामाही
आर्थिक वर्ष २४ ची पहिली सहामाही
वार्षिक वाढ
प्रमुख आर्थिक आणि अॅक्चुरियल मेट्रिक्स
वैयक्तिक एपीई
५,८६४
४,४७८
३१ टक्के
एकूण एपीई
६,७२४
५,३७३
२५ टक्के
नवीन बिझनेस प्रीमियम (वैयक्तिक + ग्रुप)
१४,४९७
१२,९७०
१२ टक्के
नूतनक्षम प्रीमियम (वैयक्तिक + ग्रुप)
१५,२४२
१३,६४३
१२ टक्के
एकूण प्रीमियम
२९,७३८
२६,६१३
१२ टक्के
असेट्स अंडर मॅनेजमेंट
३,२४,९४२
२,६४,८७०
२३ टक्के
करोत्तर नफा
९११
७९२
१५ टक्के
इंडियन एम्बेडेड व्हॅल्यू
५२,११४
४२,९०८
२१ टक्के
नवीन व्यवसायाचे मूल्य
१,६५६
१,४११
१७ टक्के
आर्थिक वर्ष २५ ची पहिली सहामाही
आर्थिक वर्ष २४ ची पहिली सहामाही
मुख्य आर्थिक रेशिओ
नवीन व्यवसायाचे मार्जिन्स
२४.६ टक्के
२६.२ टक्के
ईव्हीवर ऑपरेटिंग रिटर्न
१६.० टक्के
१६.४ टक्के
एकूण खर्च / एकूण प्रीमियम
२१.१ टक्के
१९.७ टक्के
सॉल्वन्सी रेशिओ
१८१ टक्के
१९४ टक्के
१३ महिने / ६१ महिना सातत्यता
८८ टक्के/६० टक्के
८६ टक्के/५३ टक्के
वैयक्तिक डब्ल्यूआरपी मार्केट शेअर
११.० टक्के
१०.३ टक्के
वैयक्तिक एपीईद्वारे उत्पादन संयोजन (यूएल/ नॉन पर सेव्हिंग्स /अॅन्युइटी/ संरक्षण/ पर)
३६/३८/५/६/१५
२८/२८/८/६/३०
वैयक्तिक एपीईद्वारे वितरण संयोजन (कॉर्प एजंट्स / एजन्सी / ब्रोकर/ डायरेक्ट)
६५/१७/७/११
६५/१८/७/११
टिप: टक्केवारी एकूण प्रभावामुळे वाढलेली दिसेलच असे नाही.
व्याख्या आणि संक्षेप
· अॅन्युलाइज्ड प्रीमियम इक्विव्हॅलंट (एपीई)– वार्षिकीकृत पहिल्या वर्षाच्या नियमित प्रीमियम्स आणि १० टक्के भारित सिंगल प्रीमियम तसेच सिंगल प्रीमियम टॉपअप्सची रक्कम.
· असेट्स अंडर मॅनेजमेंट (एयूएम)– विमाकंपनीने व्यवस्थापित केलेले समभागधारक आणि पॉलिसीधारकांच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य.
· एम्बेडेड व्हॅल्यू ऑपरेटिंग प्रॉफिट (ईव्हीओपी)– एम्बेडेड व्हॅल्यू ऑपरेटिंग प्रॉफिट (“ईव्हीओपी”) हे कोणत्याही दिलेल्या कालावधीत ईव्हीमधील वाढीचे माध्यम असून त्यातून आर्थिक घटकांमधील बदल तसेच भांडवल समावेश किंवा लाभांश प्रदान यांच्यासारख्या समभागधारकांच्या कृतींमुळे झालेला प्रभाव वजा केला जातो.
· पहिल्या वर्षाचा प्रीमियम– आर्थिक वर्षात पहिल्या पॉलिसी वर्षात प्राप्त झालेले नियमित प्रीमियम. उदाहरणार्थ, मार्च २०२४ मध्ये विकल्या गेलेल्या मासिक स्तरावरील पॉलिसीसाठी प्राप्त झालेला पहिला मासिक हप्ता २०२३-२४ साठी पहिल्या वर्षाचा प्रीमियम मानला जाईल आणि पहिल्या पॉलिसी वर्षातील उर्वरित ११ हप्ते प्राप्त झाल्यावर २०२४-२५ मधील पहिल्या वर्षाचे हप्ते मानले जातील.
· नवीन बिझनेसमुळे मिळालेला प्रीमियम– नवीन बिझनेसमुळे पहिल्या वर्षातील प्रीमियम आणि एकल प्रीमियमची रक्कम जी एकूण प्रीमियम म्हणून दर्शवली जाते.
· ऑपरेटिंग खर्च– यात नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी आलेले खर्च आणि पॉलिसी सर्व्हिसिंगसाठी (देखभाल खर्च मानले गेलेले) आलेले खर्च समाविष्ट केले जातात, ज्यात समभागधारकांचे खर्च समाविष्ट असतात. त्यात कमिशन समाविष्ट नसते.
· ऑपरेटिंग खर्चाचा रेशिओ– ऑपरेटिंग खर्चाचा (समभागधारकांच्या खर्चासह) एकूण प्रीमियमशी असलेला रेशिओ.
· ईव्हीवरील ऑपरेटिंग रिटर्न– ईव्हीवरील ऑपरेटिंग रिटर्न म्हणजे दिलेल्या कालावधीत ईव्हीओपी (एम्बेडेड व्हॅल्यू ऑपरेटिंग प्रॉफिट)चा त्या कालावधीच्या सुरूवातीला ईव्हीशी असलेला रेशिओ होय.
· सातत्यता- कमी झालेल्या बिझनेसपासून नूतनीकरण झालेल्या बिझनेसचे प्रमाण. हा रेशिओ दिलेल्या पॉलिसीज आणि प्रीमियम्सच्या संख्येच्या संदर्भात मोजला जाईल.
· प्रीमियम लेस बेनिफिट्स पेआऊट्स– मिळालेला एकूण प्रीमियम आणि प्रदान केलेले लाभ यांच्यातील फरक (सकल पुनर्विमा).
· रिन्यूअल प्रीमियम- पहिल्या पॉलिसी वर्षानंतर प्राप्त झालेले नियमित रिकरिंग प्रीमियम.
· सॉल्वन्सी रेशिओ– सॉल्वन्सी मार्जिन राखण्यासाठी उपलब्ध असलेल्या सॉल्वन्सीचा रेशिओ.
· एकूण प्रीमियम- पहिल्या वर्षाच्या, एकल व नूतनक्षम प्रीमियमसह वैयक्तिक आणि समूह व्यवसायासाठी वर्षभरात प्राप्त झालेले एकूण प्रीमियम.
· वेटेड रिसीव्ह्ड प्रीमियम (डब्ल्यूआरपी) – वर्षभरात प्राप्त झालेल्या पहिल्या वर्षाच्या प्रीमियमची बेरीज आणि टॉप-अप प्रीमियम्ससह १० टक्के एकल प्रीमियम्स.


