पुणे, १५ ऑक्टोबर २०२४ – कोपा मॉल ऑक्टोबर फेस्टच्या आयोजनासाठी सज्ज असून हा फेस्टिवल जगभरात १९ आणि २० ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. जर्मन संस्कृती रंगतदार पद्धतीने साजऱ्या करणाऱ्या या फेस्टिवलमध्ये आघाडीच्या ब्रुअर्सचा समावेश असलेले ३० क्राफ्ट बीयर्स तसेच ५० अस्सल जर्मन खाद्यपदार्थांची चव घेता येणार आहे.
ऑक्टोबर फेस्टमध्ये बीयर गेम्स आणि वेगवेगळे उपक्रम समाविष्ट करण्यात आले असून हा फेस्ट आनंद व सांस्कृतिकतेनं परिपूर्ण असेल. ग्राहकांना यावेळेस कोपाच्या टेरेसवर लाइव्ह संगीताचा आनंदही घेता येणार आहे. प्रसिद्ध क्राफ्ट बीयर टेस्टिंगपासून रूचकर जर्मन खाद्यपदार्थ आणि लाइव्ह परफॉर्मन्सपर्यंत विविध प्रकारची अनुभूती देणारा कोपा मॉलचा हा ऑक्टोबर फेस्ट पुण्यातला हा वीकेंड अविस्मरणीय बनवेल.
स्थळ: टेरेस, कोपा मॉल
तारीख: शनीवार- रविवार, १९- २० ऑक्टोबर
वेळ: दुपारी २ ते रात्री १०


