*
*ठाणे,दि.24(जिमाका):-* विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या पार्श्वभूमीवर आज रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे व ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी ठाणे जिल्ह्यातील 145 मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देवून निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.), मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पांडे (भा.पो.से.), 145 मिरा भाईंदर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनील भूताळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश गौंड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पिता पिंपळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजकुमार घरात, निवडणूक नायब तहसिलदार प्रदिप मुकणे व सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
या भेटीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी 145 मिरा भाईंदर विधानसभा मतदार संघातील निवडणूक कामकाजाकरिता कार्यरत स्ट्राँग रूम, कंट्रोल रूमची पाहणी केली. त्याचबरोबर एक खिडकी योजना पथक, खर्च निरिक्षक पथक, मनुष्यबळ पथक, SST / FST / VST / VVT पथक, कायदा व सुव्यवस्था पथक, 85 वर्षावरील व दिव्यांग पथक, स्वीप पथक, प्रसारमाध्यम पथक व बॅलेट पेपर व मोर्क कॉपी पथक या पथकांची माहिती घेवून त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. तसेच मतदान केंद्राची व मतमोजणी ठिकाणच्या आराखड्याची पाहणी करून 145 मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्याचबरोबर 145 मिरा भाईंदर मतदारसंघातील कार्यरत SST केंद्र व पोलिस स्थानकांसह काही मतदान केंद्रांना भेटी देवून पाहणी केली.
00000


