Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedहरियाणा प्रमाणे महाराष्ट्र मध्ये बहुमताने आमचे सरकार सत्तेत येईल - हरियाणा मुख्यमंत्री...

हरियाणा प्रमाणे महाराष्ट्र मध्ये बहुमताने आमचे सरकार सत्तेत येईल – हरियाणा मुख्यमंत्री नायब सिंग सैनी

पुणे, प्रतिनिधी –
हरियाणा मध्ये नागरिकांनी तिसऱ्यांदा भाजप सरकारला बहुमत दिले यात गरिबांचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्र मधील लोकांना माझे आव्हान आहे की, काँग्रेस खोटी आश्वासने देऊन मते विभागणी करते आणि नंतर गरिबांचे शोषण करते हा त्यांचा पूर्वइतिहास आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिमाचल प्रदेश, कर्नाटक ,तेलंगणा , हरियाणा निवडणूक मध्ये महिलांना आणि तरुणांना आश्वासने दिली पण त्याची पूर्तता अद्याप करण्यात आली नाही. लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेसने संविधान बाबत खोटा प्रचार करून ,व्होट बँक राजकारण करत नागरिकांची दिशाभुल केली. त्यामुळे महाराष्ट्र मधील नागरिकांनी आता सतर्क राहून महायुतीला साथ द्यावी. हरियाणा प्रमाणे महाराष्ट्र मध्ये बहुमताने आमचे सरकार सत्तेत येईल असे मत हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, आमदार योगेश टिळेकर, प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजप पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, कुणाल टिळक, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले, शंतनू शिंदे उपस्थित होते.
मुख्यमंत्री नायब सिंग सैनी म्हणाले, निवडणुकीत देशात दोन विचारधारा काम करत आहे. एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सन २०१४ पासून काम करत आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस काळात केवळ घोषणा दिसल्या पण विकास नाही. देशात काँग्रेसची सत्ता अनेक वर्ष राहिली पण गरिबांचे त्यांनी शोषण केल्याने ते गरीबच राहिले. पण मोदी काळात गरिबांचा विकास होऊन ते मुख्य प्रवाहात येऊ लागले. गरिबांना सन्मान देण्याचे काम मोदी यांनी केल्याने त्यांना इतरांकडे मदतीस जावे लागत नाही. काँग्रेसच्या ५५ वर्ष काळात देश धीम्या गतीने विकासाकडे वाटचाल करत होता कारण भ्रष्टाचार होता. मोदी काळात भ्रष्टाचार नसल्याने विकास मागील दहा वर्षात गतीने झाले.देशात २५ कोटी लोकांना गरीबी मधून बाहेर काढण्यात आले. महिला, युवक, शेतकरी सशक्तीकरण याबाबत पंतप्रधान यांनी भरीव काम केले. काँग्रेसने ५५ वर्षात जेवढे गरिबांना घरे बनवली त्यापेक्षा दुप्पट गरीब व्यक्तींना दहा वर्षात घरे दिली. चार कोटी लोकांना घरे दिली गेली. जे पैसे गरीब लोकांवर खर्च होणे अपेक्षित होते ते काँग्रेसने भ्रष्टाचार मध्ये घालवले. काँग्रेसचा खोटा चेहरा उघडकीस आला आहे. पायाभूत सुविधा, रेल्वे सेवा मजबुतीकरण, विमानतळ विस्तारीकरण, आरोग्य व्यवस्था सक्षमीकरण, सीमावर्ती भागात सुरक्षित वातावरण मोदी सरकारने केले. काँग्रेस काळात दहशतवादमुळे लोक भयभीत होते आणि तीच परिस्थिती त्यांना पुन्हा निर्माण करण्याची इच्छा दिसून येत आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली.
काँग्रेस प्रधानमंत्री सांगत देशाच्या साधन संपत्तीवर प्रथम अल्पसंख्याक यांचा हक्क आहे पण मोदी सांगतात देशाच्या साधन संपत्तीवर गरिबांचा प्रथम हक्क आहे. मोदी यांनी कोणता भेदभाव न करता सर्व समाजासाठी कल्याणकारी योजना सुरू केल्या पण काँग्रेस जातीभेदाचे राजकरण करत आहे. भाजप काळात महागाईवर अंकुश ठेवण्यात आला असून काँग्रेस काळात महागाईचा त्रास जनतेला झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments