Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंग गॅलॅक्‍सी एस२४ सिरीजसह मोबाइल एआयच्‍या नवीन युगाचा अनुभव घ्‍या

सॅमसंग गॅलॅक्‍सी एस२४ सिरीजसह मोबाइल एआयच्‍या नवीन युगाचा अनुभव घ्‍या

सॅन जोस, सीए – जानेवारी १७, २०२४ – सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स कं. लि.ने आज गॅलॅक्‍सी एस२४ अल्‍ट्रा, गॅलॅक्‍सी एस२४+ आणि गॅलॅक्‍सी एस२४ लाँच केले, जेथे गॅलॅक्‍सी एआयसह नवीन मोबाइल अनुभवांना सादर केले आहे. गॅलॅक्‍सी एस सिरीज नवीन युगामध्‍ये प्रवेश करत आहे, जे मोबाइल डिवाईसेस वापरकर्त्‍यांना सक्षम करण्‍याच्‍या पद्धतींमध्‍ये कायमस्‍वरूपी परिवर्तन घडवून आणेल. एआय गॅलॅक्‍सी एस२४ सिरीजवरील जवळपास प्रत्‍येक अनुभवाला अधिक उत्‍साहित करते. इंटेलिजण्‍ट टेक्‍स्‍टसह विनाव्‍यत्‍यय संवाद व कॉल सुविधा देते, गॅलॅक्‍सीच्‍या प्रोव्हिज्‍युअल इंजिनसह सर्जनशीलता देते आणि सर्चसाठी नवीन मानक स्‍थापित करते, जे गॅलॅक्‍सी वापरकर्त्‍यांच्‍या आसपासच्‍या विश्‍वाबाबत जाणून घेण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये परिवर्तन घडवून आणतील.

 

”गॅलॅक्‍सी एस२४ सिरीज जगासोबतच्‍या कनेक्‍शनमध्‍ये परिवर्तन घडवून आणते आणि पुढील दशकामध्‍ये मोबाइल इनोव्‍हेशनला चालना देते,” असे सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स येथील मोबाइल एक्‍स्‍पेरिअन्‍सचे अध्‍यक्ष व प्रमुख टीएम रोह म्‍हणाले. ”गॅलॅक्‍सी एआय आमचा इनोव्‍हेशन वारसा आणि व्‍यक्‍तींच्‍या फोन वापराच्‍या पद्धतींबाबत असलेल्‍या माहितीच्‍या आधारावर निर्माण करण्‍यात आले आहे. आम्‍ही जगभरातील आमचे वापरकर्ते नवीन संधींचा आनंद घेण्‍यासाठी गॅलॅक्‍सी एआयसह दैनंदिन जीवन कशाप्रकारे सक्षम करतील, हे पाहण्‍यासाठी उत्‍सुक आहोत.”

 

दैनंदिन अनुभव एपिक बनवा

 

गॅलॅक्‍सी एआय अर्थपूर्ण इंटेलिजन्‍स सादर करते, ज्‍याचा जीवनातील प्रत्‍येक टप्‍प्‍याला, विशेषत: फोनची सर्वात मुलभूत भूमिका म्‍हणजे संवादाला वाढवण्‍याचा मनसुबा आहे. ग्राहक लाइव्‍ह ट्रान्‍सलेट, इंटेरप्रीटर, चॅट असिस्‍ट, नोट असिस्‍ट आणि ट्रान्स्क्रिप्‍ट असिस्‍ट अशा एआय वैशिष्‍ट्यांसह विना-व्‍यत्‍यय संवादाचा आनंद घेऊ शकतात. गॅलॅक्‍सी एस२४एस२४ सर्च हिस्‍ट्रीमधील मैलाचा दगड आहे, जेथे हा गुगलसह सर्वोत्तम, गेस्‍चर-संचालित सर्कल टू सर्च असलेला पहिला फोन आहे.

 

जगाचा नव्‍या पद्धतीने शोध घेण्‍यासाठी सर्जनशीलतेचा आनंद घ्‍या

 

गॅलॅक्‍सी एस२४ सिरीजमधील प्रोव्हिज्‍युअल इंजिन एआय-समर्थित टूल्‍सचे सर्वसमावेशक सूट आहे, जे फोटो कॅप्‍चर करण्‍याच्‍या क्षमतेमध्‍ये परिवर्तन करते आणि सर्जनशीलता वाढवते. गॅलॅक्‍सी एस२४ अल्‍ट्रामधील क्‍वॉड टेलि सिस्‍टम नवीन ५x ऑप्टिकल झूमसह ५० मेगापिक्‍सल सेन्‍सरसोबत काम करते आणि २x, ३x, ५x ते १०x१० मॅग्‍नीफिकेशनपर्यंतच्‍या झूम लेव्‍हल्‍समध्‍ये ऑप्टिकल-क्‍वॉलिटी परफॉर्मन्‍सची खात्री देते. याचे श्रेय अॅडप्टिव्‍ह पिक्‍सल सेन्‍सरला जाते. सुधारित डिजिटल झूमसह फोटो १००x मध्‍ये अत्‍यंत सुस्‍पष्‍ट दिसतात.

 

आकर्षक फोटोज कप्‍चर केल्‍यानंतर नाविन्‍यपूर्ण गॅलॅक्‍सी एआय एडिटिंग टूल्‍स इरेज, रि-कम्‍पोज व रिमास्‍टर यांसारख्‍या सोप्‍या एडिट्सची सुविधा देते. सुलभ व अधिक कार्यक्षम ऑप्टिमायझेशन्‍ससाठी एडिट सजेशन गॅलॅक्‍सी एआयचा वापर करत प्रत्‍येक फोटोसाठी परिपूर्ण योग्‍य ट्विक्‍सचा सल्‍ला देते. वापरकर्त्‍यांना अधिक क्रिएटिव्‍ह कंट्रोल व स्‍वातंत्र्य देण्‍यासाठी जनरेटिव्‍ह एडिट जनरेटिव्‍ह एआयच्या माध्‍यमातून फोटोच्‍या पार्श्‍वभूमीला अधिक आकर्षक करू शकते. नवीन इन्‍स्‍टण्‍ट स्‍लो-मो अधिक सविस्‍तरपणे गोष्‍टी दिसण्‍याकरिता अॅक्‍शन-पॅक क्षणांना अधिक स्‍लो करण्‍यासाठी हालचालींवर आधारित अतिरिक्‍त फ्रेम्‍सची निर्मिती करू शकते.

 

गॅलॅक्‍सीचा आतापर्यंतचा सर्वात इंटेलिजण्‍ट अनुभव, ज्‍याला प्रिमिअम परफॉर्मन्‍सचे पाठबळ आहे

 

प्रत्‍येक गॅलॅक्‍सी एस२४ अल्‍ट्रामध्‍ये गॅलॅक्‍सीसाठी स्‍नॅपड्रॅगन® ८ जेन ३ मोबाइल प्‍लॅटफॉर्म आहे. विशेषत: गॅलॅक्‍सी वापरकर्त्‍यांसाठी सानुकूल करण्‍यात आलेली ही चिपसेट अविश्‍वसनीय कार्यक्षम एआय प्रोसेसिंगकरिता उल्‍लेखनीय सुधारित एनपीयू देते. तिन्‍ही गॅलॅक्‍सी एस२४ मॉडेल्‍समध्‍ये १-१२० हर्टझ अॅडप्टिव्‍ह रिफ्रेश रेट्स परफॉर्मन्‍स कार्यक्षमतेमध्‍ये सुधारणा करतात.

 

सर्वात प्रखर गॅलॅक्‍सी डिस्‍प्‍लेवरील व्हिज्‍युअल्‍स अधिक वैविध्‍यपूर्ण व लक्षवेधक आहेत. गॅलॅक्‍सी एस२४ २,६०० नीट सर्वोच्‍च ब्राइटनेस देतो, तसेच व्हिजन बूस्‍टरसह सूर्यप्रकाशात डिस्‍प्‍लेवरील पिक्‍चर्स सुस्‍पष्‍टपणे दिसण्‍याची खात्री मिळते.

 

अॅडवान्‍स्‍ड सिक्‍युरिटी व प्रायव्‍हसीने युजर निवडी व विश्‍वासाला अधिक दृढ केले

 

गॅलॅक्‍सीचे डिफेन्‍स-ग्रेड, मल्‍टी-लेयर सुरक्षितता व्‍यासपीठ सॅमसंग नॉक्सचे संरक्षण असलेला गॅलॅक्‍सी एस२४ महत्त्वपूर्ण माहितीचे संरक्षण करतो, तसेच एण्‍ड-टू-एण्‍ड सुरक्षित हार्डवेअर, रिअल-टाइम थ्रेट डिटेक्‍शन आणि सहयोगात्‍मक प्रोटेक्‍शनसह असुरक्षिततेपासून संरक्ष

ण करतो.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments